Dasheri Mango
Dasheri Mango Agrowon
Image Story

प्रतिकूल हवामानामुळे दशेरी आंब्याच्या उत्पादनात घट

Devendra Shirurkar
Mango

दशेरी आणि इतर प्रकारच्या आंबा प्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आहे. प्रतिकूल हवामानामुळे यंदा उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादनात ७० टक्क्यांची घट झाली आहे.

Mango

उत्पादन घटल्यामुळे आंब्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात दरवर्षी सरासरी ३५ ते ४५ लाख टन आंब्याचे उत्पादन होते. प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्यामुळे यंदा राज्यातील आंब्याचे उत्पादन १० ते १२ लाख टनांवर सीमित झाले आहे.

Mango

त्यामुळे बाजारात आंबा चढ्या दराने विकल्या जात आहे. आंबा प्रेमींना आंब्यासाठी जास्त आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

Mango

फेब्रुवारी आणि मार्च या मोहोर येण्याच्या मोसमातील उच्चतम तापमानामुळे आंबा उत्पादनात घट झाली आहे. या मोसमात ३० ते ३५ अंश सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते. प्रत्यक्षात या मोसमात पारा ४० अंश सेल्सियसवर गेल्यामुळे आंब्याचे नुकसान झाले.

Mango

लखनौमधील मलिहाबाद हे आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून इथला दशेरी आंबा त्याच्या विशिष्ट चवीमुळे जगभरात ओळखल्या जातो. यावर्षी हजारो आंबा उत्पादकांना प्रतिकूल हवामानाचा फटका बसला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Mango

हवामानतज्ज्ञांच्या मते यावर्षीचा मार्च महिना हा गेल्या १२२ वर्षातील सर्वाधिक उष्ण मार्च ठरला आहे तर यंदाच्या एप्रिल महिन्यातील तापमानही ५० वर्षातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT