चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू उत्पादकांना संघटित केले आहे. कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विभाग, अन्य शासकीय यंत्रणा, व्यापारी, वाहतूकदार, वेस्टन साहित्य उत्पादक आदी सर्वांना सोबत घेऊन संघ वाटचाल करीत आहे. आज संघाचे राज्यभर तीनशेहून अधिक सभासद आहेत. राज्यात तीस हजारांपेक्षा जास्त क्षेत्रात चिकूची लागवड झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नवी लागवडदेखील होत असून, दिवसेंदिवस क्षेत्र वाढत आहे. भौगोलिक निर्देशांक मिळाले चिकू हे फळ आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त, चवीला गोड आहे. त्यामुळे डॉक्टर तसेच आहारतज्ज्ञ देखील आजारी, अशक्त व्यक्तीला चिकू खाण्याचा विशेष सल्ला देतात राज्यात तसेच देशांमध्ये या फळाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे. चिकू हे फळ अन्य फळांप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणावे तसे पोहोचलेले नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गरीब जनतेचे फळ असेही त्यास संबोधण्यात येते. कारण अन्य फळांच्या तुलनेत ते स्वस्तही आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका या फळासाठी प्रसिद्ध आहे. या फळाला २०१६ मध्ये ‘डहाणू, घोलवड चिकू’ असे भौगोलिक निर्देशांकदेखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे फळ आज जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. या भागातील बचत गटांमार्फत चिकूपासून मूल्यवर्धित पदार्थही बनवले जात आहेत. डहाणू पर्यटनस्थळ असल्यामुळे विक्रीही चांगल्या प्रकारे होत असते. परंतु तरीही मोठ्या प्रमाणात त्याचे मूल्यवर्धन करून निर्यात होणे गरजेचे वाटते. सदस्यांना सुविधा या फळाला विशेष करून उत्तर भारतात थंड हवेतील प्रदेशांमध्ये खूप मागणी आहे. यंदाच्या जानेवारीपासून केंद्र सरकारच्या ‘किसान रेल’ योजनेमार्फत दररोज १५० ते २०० टन चिकू डहाणू तालुक्यातून दिल्ली येथे अनुदानित वाहतूक दरामध्ये पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे कमी वाहतूक दरात फळे लवकर पोहोचतात; शिवाय सुरक्षित वाहतूक होते. अशा प्रकारे चिकू बागायतदारांना फायदा होत आहे. बागेसाठी लागणाऱ्या निविष्ठा (उदा. कीडनाशके, खते) काही गटांमार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समस्या सन २०१३ पासून चिकूला हवामान आधारित विम्याचे कवच मिळत आहे. परंतु त्याच्या अटी थोड्या जाचक आहेत. तसेच यासंबंधी नियमावली बनविताना चिकू उत्पादकांना विश्वासात घेतले पाहिजे होते. ते न झाल्याने त्याचा फायदा चिकू उत्पादकांना कमी मिळतो. चिकूवर प्रक्रिया करण्यासाठी खूप वाव आहे. यामध्ये तीन ते चार प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. मात्र या मूल्यवर्धित पदार्थांना पाहिजे तशी बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मूल्यवर्धित पदार्थ साखळी निर्माण करण्याची गरज आहे. अपेक्षा
- विनायक बारी,९२२६४८४२२८
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ
(शब्दांकन ः उत्तम सहाणे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील, जि. पालघर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.