Sacred Tree 
औषधी वनस्पती

जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्म

पळसाचे झाड फुलांनी बहरल्यानंतर लालबुंद दिसून सर्वांचे लक्ष वेधून घेते. ही वनस्पती दिसायला जशी सुंदर, तशी औषधी म्हणूनही गुणकारी असते. या वनस्पतीच्या खोडाची साल, फुले, पाने औषध म्हणून उत्तम कार्य करतात.

डॉ. विनीता कुलकर्णी,

आपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे. तीन दलांची पाने हे या वनस्पतीचे खास वैशिष्ट्य. पळसाचे झाड फुलांनी बहरल्यानंतर लालबुंद दिसून सर्वांचे लक्ष वेधून घेते. ही वनस्पती दिसायला जशी सुंदर, तशी औषधी म्हणूनही गुणकारी असते. या वनस्पतीच्या खोडाची साल, फुले, पाने औषध म्हणून उत्तम कार्य करतात. 

  • उष्ण तब्येत तसेच जास्त तिखट पदार्थ खाण्यामुळे मूत्रविसर्जनावेळी आग होते. पूर्ण साफ होत नाही. अशावेळी पळसाची फुले वाळवून त्याचे चूर्ण करावे. हे चूर्ण दूध व खडीसाखरेसह घ्यावे.
  • अंगात कडकी भरणे, सतत हातापायांची आग होणे या लक्षणांमुळे त्रास होतो. त्यासाठी रात्री पळसाची फुले ग्लासभर पाण्यात भिजत घालावीत. त्या पाण्यात सकाळी साखर घालून प्यावे. आराम मिळतो.
  • महिलांमध्ये मासिक स्राव अधिक असेल तर पळसाच्या फुलांचे चूर्ण इतर औषधांसह वापरावे. किंवा फुले पाण्यात भिजत घालून ते पाणी प्यावे.
  • सूज, गळू यावर पळसाची पाने बांधावीत. पण पोटात औषधे मात्र जरूर घ्यावीत.
  • खूप गोड खाणे किंवा अन्य कारणांनी पोटात कृमी (जंत) होतात. त्यासाठी वावडिंग, ओवा, पळसाचे बी यांचे चूर्ण १ ग्रॅम प्रमाणात १ ते २ वेळा घ्यावे. हे चूर्ण जंतावर उत्तम काम करते. उष्णता, रक्तस्राव यांसाठी पळसाची फुले उत्तम काम करतात.
  • पळस औषधी वनस्पती आहे. पण या उपचारांच्या जोडीला पथ्य पालन करणे जरुरी आहे.
  • पथ्य 

  • खूप तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ वारंवार खाऊ नयेत.
  • रात्री जास्त वेळ जागरण करणे टाळावे. जेवणाच्या वेळा पाळाव्यात.
  • दारू सेवन, सिगारेट यांसारखी व्यसने टाळावीत.
  • पाणी भरपूर प्यावे.
  • काळजी 

  • मूत्रविसर्जनास वारंवार जास्त त्रास होणे, ताप, अंगदुखी होत असल्यास लघवीची तपासणी करून घ्यावी.
  • पोटाच्या कडेला दुखणे, लघवी साफ होत नसेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या कराव्यात.
  • अंगामध्ये जास्त ताप असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे औषधे घ्यावीत.
  • संपर्क ः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Procurement: दहा लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी, सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्री फडणवीसांना अपेक्षा

    Farm Land Dispute: जमिनीच्या वादातून महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

    Livestock Farmers Support: चारशे पशुपालक शेतकऱ्यांना चाळीस लाखांची मदत

    Scientific Dairy Farming: शास्त्रोक्त पशुपालनातून फायदेशीर दुग्ध व्यवसाय

    Diesel Shortage: शेतीच्या कामांना इंधनटंचाईचा फटका

    SCROLL FOR NEXT