health benefits of cardamom 
औषधी वनस्पती

बहुगुणी वेलची

वेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर पावडर तयार करताना हमखास याचा वापर केला जातो.​

विनीता कुलकर्णी

वेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर पावडर तयार करताना हमखास याचा वापर केला जातो.​

वेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर पावडर तयार करताना हमखास याचा वापर केला जातो. अशी ही वेलची औषधी गुणांनी युक्त असते. आपल्या दैनंदिन आहारात वेलचीचा उपयोग केलाच पाहिजे.

  • पाचक म्हणून वेलची उत्तम काम करते. अपचनामुळे ढेकर येत असतील तर वेलची चावून खावी किंवा ठेचून पाण्यात घालून काढा करावा. त्यामध्ये साखर घालून सेवन करावे. काढ्याचे सेवन एकदम करू नये. थोडा-थोडा घ्यावा.
  • उलट्या होत असतील तर वेलदोडा सोलून त्याच्या साली फक्त घ्याव्यात. साली तव्यावर भाजून घेऊन (काळ्या होईपर्यंत) थंड कराव्यात. त्याची पावडर करून ती मधासह चाटण स्वरूपात दोन ते तीन वेळा घ्यावी. सारखी उचकी लागत असल्यास चाटण घेणे फायदेशीर ठरते.
  • वेलची कफ कमी करणारी असल्याने, वेलची पावडर आणि सुंठ पाव चमचा मधासह घेतल्यास कफ कमी होतो.
  • हवामान बदलामुळे कोरड्या खोकल्याचा त्रास उद्‍भवतो. अशा वेळी पूर्ण वेलदोडे जाळून त्याची पावडर तुपासह घेतल्यास खोकला कमी होण्यास मदत होते.
  • जास्त तिखट, चमचमीत पदार्थ सेवन केल्यास किंवा कमी प्रमाणात पाणी पिल्यामुळे लघवीला जळजळ होते. अशावेळी वेलची चूर्ण दूध आणि साखरेसह घ्यावे.
  • अवेळी किंवा उशिरा केलेले जेवण, रात्री जागरण या कारणांनी बऱ्याचदा पोटात गॅसेस होतात. अशावेळी वेलची पावडर आणि हिंग (भाजलेले) लिंबाच्या रसासह घेतल्यास उपयोग होतो. हिंग वापरण्यापूर्वी साजूक तुपावर भाजून घेऊन थंड झाल्यावर वापर करावा.
  • वेलची स्निग्ध गुणधर्मी असल्याने पौष्टिक औषधांसह वापरली जाते. शतावरी, अश्‍वगंधा, गोखरू, मुसळी, बदाम, वेलची, साखरेसह एकत्र करून तुप किंवा दुधासोबत घेतल्यास उत्तम पौष्टिक म्हणून काम करते.
  • पथ्य 

  • जेवणाच्या वेळा पाळाव्यात. अवेळी जेवण, बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे टाळावे.
  • चहाचा अतिरेक, आहारात कडधान्ये, फरसाण, शेवसारखे कोरडे पदार्थाचे सेवन जास्त करणे टाळावे. या सर्व पदार्थांमुळे पचनामध्ये बिघाड होतो.
  • काळजी

  • उलट्या होत असतील किंवा सतत उलटीचा त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.
  • पौष्टिक औषधे घेण्यापूर्वी प्रथम पचनशक्ती सुधारून घ्यावी अन्यथा अपेक्षित परिणाम होत नाही.
  • खोकला, कफ, ताप जास्त असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • संपर्क- डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

    Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

    Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

    Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

    Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

    SCROLL FOR NEXT