Farmers Protest: बीडमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक! चुकीचे पंचनामे आणि तुटपुंज्या मदतीविरोधात किसान सभा आंदोलन पुकारणार
Kisan Sabha: बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, मदतीच्या नावाखाली चुकीचे पंचनामे आणि अपुरी मदत दिल्याचा आरोप किसान जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे यांनी केला आहे. या अन्यायाविरोधात किसान सभा २२ ऑक्टोबर रोजी गावोगाव आंदोलन करणार आहे.