Palghar News : मुरूड तालुक्यातील ३३०० हेक्टर क्षेत्रावरील भाताचे यंदा चांगले हवामान, पावसामुळे चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे, पण यंदा शेतीच्या कामांसाठी मजुरी वाढल्याने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतरही भातकापणीची कामे फक्त १० टक्के इतकीच झाली आहेत. .मुरूड तालुक्यात ३००० मिलिमीटर इतके पर्जन्यमान झाले आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे भातावर रोगाचा प्रादुर्भाव झालेली नाही, पण आता थंडी पडायला सुरुवात झाल्याने शेतकरी भातकापणीनंतर कडवे वाल, चवळी, मूग आदी कडधान्य पेरणीच्या तयारीत आहेत. .Paddy Farming : डहाणूत बळीराजा सुखावला .उखारु जमिनीवरील हळव्या भाताची कापणी, झोडणीचे काम सुरू असून खार पट्ट्यातील तर खोलगट भागातील गरवे भात कापणीला आला आहे, पण मजुरी वाढली असल्याने त्याचा फटका शेतकऱ्याला बसत आहे. सध्या पुरुषांसाठी ६०० रुपये, तर महिलांसाठी ३०० रुपये मजुरी चुकवावी लागते..Paddy Farming : भातपिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव.पूर्वी नातेवाईक, कुटुंबातील माणसे एकमेकाला कापणी, बांधणी, उडवे रचण्याकामी परस्पर सहकार्य करत होते. त्याला ग्रामीण बोलीत ‘पटेल’ असे बोलतात, परंतु रोजगाराच्या शोधात असलेली बहुतांश कुटुंबे मुंबई, नवी मुंबईत स्थलांतरीत झाल्याने रोजंदारीचा खर्च वाढला आहे..शेती परवडत नसल्याची ओरडभातशेतीला लागवडपूर्व व लागवडीनंतर मशागत, बियाणे, खते, मजुरीचा विचार करता खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. यापूर्वी भातविक्रीसाठी रोहा तालुक्यात जावे लागत होते, मात्र चार वर्षांपासून मुरूड तालुक्यात पणन विभागातर्फे शासन भात खरेदी करत आहे, पण भाताला प्रतिक्विंटल २३०० चा भाव, दोन वर्षांपासून बोनस मिळत असला तरी शेती परवडत नसल्याची ओरड आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.