बावनकुळे म्हणाले, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रशासन सज्ज ज्यांचे केवायसी झालेले आहे; त्यांना लगेच मदत मिळेल पण काही तांत्रिक अडचणी आल्या तरी तहसीलदार, प्रांत यांच्यापर्यंत सूचना दिल्या आहेत.Farmers Relief Package: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शुक्रवारी (दि. १७) नागपुरात बोलताना सांगितले. दिवाळीपूर्वी पूरग्रस्त शेतकऱ्यांना पॅकेजची मदत मिळावी. यासाठी मी परवा आणि कालही सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असल्याचे त्यांनी नमूद केले. .ज्यांचे केवायसी झालेले आहे; त्यांना लगेच मदत मिळेल. पण काही तांत्रिक अडचणी आल्या तरी तहसीलदार, प्रांत यांच्यापर्यंत सूचना दिल्या आहेत. दिवाळीपूर्वी कोणाला मदत द्यायची राहिली का? हे पाहण्यास सांगितले आहे. सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे की दिवाळापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. यावर आम्ही काम करत असल्याचे बावनकुळे म्हणाले. .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६५ मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. . Ativruhsti Madat GR: अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीचे दर आणि निकष कोणते; शासन निर्णय प्रसिद्ध.राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. आता सरकारकडून प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यासाठी हालचाली सुरु आहेत..Crop Damage: 'अतिवृष्टीनं पीक नष्ट झालं, गाव, घर सोडावं लागलं, 'या' दिवाळीत साडी घेणं तर दूरच', गोष्ट एका महिला शेतकऱ्याची.'भुजबळांना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत समजावलं'दरम्यान, २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटचा काढलेला जीआर रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. त्यासाठी बीडमध्ये आज महाएल्गार सभा होत आहे. या सभेत मंत्री छगन भुजबळ सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी भुजबळ यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. भुजबळ यांना मी मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत 'जीआर'बाबत समजावले आहे. 'जीआर'मुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. परंतु, तरीदेखील त्यांचे काही संभ्रम आहेत. त्यामुळे त्यांनी मोर्चा काढला, असे बावनकुळे म्हणाले. .राज्यामध्ये महसूल विभागात मागील आठ दहा वर्षापासून थांबलेली बढती प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.