Ajwain 
औषधी वनस्पती

महौषधी ओवा

स्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा! अनेक पदार्थांना चव आणण्यासाठी ओव्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. ओवा औषधी म्हणूनही उत्तम कार्य करतो.

विनीता कुलकर्णी

स्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा! अनेक पदार्थांना चव आणण्यासाठी ओव्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. ओवा औषधी म्हणूनही उत्तम कार्य करतो.

  • वातूळ पदार्थ, अवेळी जेवण या कारणांनी पोटात गॅसेस होतात आणि पोट दुखते. अशावेळी ओव्याचे ३-४ दाणे चावून खावेत आणि गरम पाणी प्यावे.
  • बऱ्याच वेळा भूक चांगली लागते. पण थोडे अन्न सेवन केले तरी पोट जड होऊन ढेकर येतात. अशा वेळी जेवणानंतर ओवा खावा.
  • लहान मुलांना जास्त गोड खाण्यामुळे किंवा अन्य कारणांनी जंत होतात. त्यासाठी ओवा आणि सैंधव यांचे मिश्रण करून द्यावे.
  • काही लोकांना पोटात गॅसेस होणे, पचनशक्ती मंदावणे असे त्रास वारंवार होतात. अशावेळी ओवा, जिरे, हळीव आणि मेथी दाणे समभाग घेऊन मिक्‍सरमधून बारीक करावे. तयार पावडर अर्धा चमचा प्रमाणात गरम पाण्यासह जेवणानंतर घ्यावी.
  • सर्दी झाल्यास ओव्याच्या पुरचुंडीने शेकावे. शिवाय त्याचा वास घ्यावा.
  • मळमळणे, उलटीचा त्रास, तोंडाला पाणी सुटणे यासाठी ओवा पावडर आणि लवंग पावडर पाव चमचा प्रमाणात मधासह घ्यावी.
  • कृमीसाठी ओवा विड्याच्या पानाबरोबर सेवन करावा.
  • गर्भवती महिलांना अपचनाचा त्रास सतत जाणवतो. अन्नपचन सुधारण्यासाठी, ओव्याचे गरम पाण्यासह नियमित सेवन करावे.
  • पथ्य

  • वारंवार पोटात गॅसेस होणे, पोट जड होणे, पचनाच्या तक्रारींसाठी जेवणाच्या वेळा सांभाळाव्यात.
  • वाटाणा, पावटा, मटकी, हरभरा अशा उसळींचे काही दिवस कमी सेवन करावे.
  • जेवणामध्ये गरम पाणी प्यावे.
  • फरसाण, शेव, मिठाई, भेळ, चाट यांचे प्रमाण कमी असावे किंवा वर्ज्य करावे.
  • भूक लागलेली असताना चहा- कॉफीचे पिऊ नये. त्यामुळे पचन बिघडते.
  • काळजी 

  • पोटदुखीच्या तीव्र स्वरूपाच्या वेदना, उलट्या, ताप इ. लक्षणे असतील डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासण्या कराव्यात.
  • लघवीची तपासणी करून जंतुसंसर्ग आहे का तपासून घ्यावे.
  • अवेळी जेवण करणे टाळावे.
  • संपर्क-   डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    महाराष्ट्र

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

    Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

    Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

    Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

    Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

    SCROLL FOR NEXT