Raigad News: जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात सुमारे ६६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे. सर्व पंचनामे पूर्ण झाले असून, नुकसानीसाठी एक कोटी ७५ लाखांच्या अनुदानाची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान पेण, कर्जत तालुक्यातील भातशेतीचे झाले आहे. पावसाचे सातत्य कायम असल्याने पिकांचे आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे..आठवडाभरातील नुकसानीची आकडेवारीतालुका हेक्टरअलिबाग २३८.००पेण ७५६.५मुरूड १.४६खालापूर २१.७१कर्जत ७३१.६६.Rain Crop Loss : ‘साहेब, चांगलं पीक आलं, पण पावसानं सगळं नेलं.पनवेल ८.४०उरण २४४.८माणगाव ३५.००तळा ५२.१०रोहा ५१.४०सुधागड-.पाली १.१५महाड ०.२०पोलादपूर १०.९५म्हसळा ३२.३४श्रीवर्धन ०.२५एकूण २१८५.९२.Crop Loss Maharashtra : शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त, पण सरकारला पाझर फुटेना.नव्या पीकविमा योजनेचा फटकाजिल्ह्यात १६ हजार ५४ शेतकऱ्यांनीच पीक विमा उतरवला आहे. ही संख्या एकूण शेतकऱ्यांपेक्षा खूपच कमी आहे. सध्या कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी आठ हजार ५००, तर बागायती पिकांसाठी १७ हजारांची मदत जाहीर केली आहे. बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रुपये मदत दिली. .जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेतच ही मदत मिळणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद आहे. नुकसानीच्या पंचनाम्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना जीपीएस लोकेशन असलेला फोटो बंधनकारक आहे. दरम्यान, शेतात गुडघ्याइतके पाणी असल्याने एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत मिळवणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे..नुकसानीवरील दृष्टिक्षेपबाधित गावे ६०६बाधित शेतकरी ५,८७८३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र २१८५.९२अपेक्षित अनुदान १८५.८० (लाख रु.)प्रत्यक्ष दिलेले अनुदानाचा आकडा शुन्य आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.