Animal Health Agrowon
ॲनिमल केअर

Animal Health : जनावरांतील सुप्त गर्भाशयदाहाचा प्रतिबंध

जनावरांची प्रजनन क्षमता कमी करणारा गर्भाशय दाह आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरतो. प्रसूतीनंतर गर्भाशय दाह घडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. गर्भाशय दाह हा तीव्र आणि सौम्य स्वरूपाचा असतो. पशुवैद्यकाकडून जनावराच्या आजाराची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना कराव्यात.

Team Agrowon

डॉ. बी. सी. घुमरे, डॉ. व्ही. व्ही. कारंडे

पशू आरोग्य (Animal Health) ही व्यवस्थापनातील महत्त्वाची बाब असते. प्रतिबंधातून अनेक अडथळे टाळता येतात. जनावरांचे दररोज पडणारे शेण, मूत्र यांचे प्रमाण, प्रत, रंग यावरून पचनाच्या शरीरक्रियातील दोष कळू शकतात.

योनीमार्गातून वाहणारे स्त्राव प्रजनन अवस्थेनुसार आहेत किंवा नाही याचे निदान पशुपालक स्वत: करू शकतो. माजाचा स्त्राव स्वच्छ आहे का? याकडेही लक्ष दिले जाते. काही वेळा जनावरांना सुप्त गर्भाशयदाह होत असतो. त्यामुळे प्रजननाची हानी होते.

गर्भाशय हा प्रजनन संस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. गर्भाशयास इजा, दाह, रोग प्रसार, औषध सोडण्यासाठी हाताळणी, वार ओढून काढताना जखमा होतात. उघड्या गर्भाशय मुखातून रोगाचा शिरकाव होऊन हानी होते. प्रसूतीनंतर पंधरवड्यात गर्भाशय दाह होण्याची शक्यता अधिक असते.

गर्भाशय दाह हा तीव्र आणि सौम्य स्वरूपाचा असतो. तीव्र गर्भाशय दाह झाल्यास योनी मार्गावाटे घट्ट पू, पातळ पू, रक्त मिश्रित पू, पांढरे धागे असणारा स्राव दिसून येतो. यावरून गर्भाशय दाह झाला असल्याचे दिसून येते.

सुप्त गर्भाशय दाह असल्यास दिसून येत नाही. जनावरांच्या योनी मार्गातून वाहणारा स्राव थोडा धुरकट, धूसर असतो, मात्र तो रंगहीन असतो. संपूर्ण स्राव स्वच्छ असणे शेवटचा भाग मात्र थोडा धूसर, पांढरट, धागे असणारा दिसून येणे ही सुप्त सुप्तगर्भदाहाची निदर्शक बाब असते.गर्भाशय दाह असल्यास फलन न होणे, गर्भधारणा होण्यासाठी अनेक वेळा रेतन करावे लागते. म्हणजेच जनावरे उलटणे, व्यायल्यापासून पुढील गर्भधारणा होणारा काळ लांबतो.

जनावरांची प्रजनन क्षमता कमी करणारा गर्भाशय दाह आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरतो. प्रसूतीनंतर गर्भाशय दाह घडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.प्रसूतीच्या वेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण काटेकोरपणे न पाळणे जाणे हेच मुख्य कारण गर्भाशय दाह होण्यास पूरक ठरते. गोठा परिसर, बाह्य जननेंद्रीय, दूषित पाणी, वातावरणामध्ये अनेक रोग जंतू असतात. प्रसूतीमुळे होणारा शारीरिक ताण आणि कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती रोगकारक जंतूंचा प्रसार, शरीरात रोग घडविण्यास आणि प्रामुख्याने गर्भाशयावर प्रादुर्भाव करून दाह निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो.

प्रसूतीनंतर सुप्त गर्भाशय दाह घडतो, मात्र दिसून येत नाही. असे रोगी गर्भाशय अत्यंत कमी प्रमाणात रोगजंतू मिश्रित स्राव सतत बाहेर टाकत असते. त्यातूनच कास दाह होण्याचे प्रमाण वाढते.सुप्त गर्भाशय दाह झाला, की सुप्त कास दाह होणे अपेक्षित असते. यातून दूध प्रत कमी होते, दुधाचे प्रमाण कमी होते व आर्थिक तोटा होतो.

जनावरांचे व्यवस्थापन

पहिल्या माजास जनावरे कृत्रिम रेतानाने भरू नयेत असा तांत्रिक संकेत आहे. प्रसूती नंतरच्या पहिल्या माजास कृत्रिम रेतन न करता त्यांचा बळस/सोट जंतू विरहित आहे का? याचे परीक्षण करणे शहाणपणाचे ठरते. या माजामध्ये होणाऱ्या स्रावाची तपासणी, प्रयोगशाळेतील निदानाद्वारे स्राव म्हणजे गर्भाशय निरोगी असल्याची खात्री असते. म्हणून माजास नियमितपणे आलेले जनावर एकाच रेतनात गाभण ठरण्याची शक्यता फार मोठी असते.

काही जनावरांचे खालावलेले प्रकृतिमान, वातावरणाचा ताण, प्रसूती पश्‍चात रोगप्रसार, दूध उत्पादनामुळे शरीर झीज झाल्यास सुप्त गर्भाशय दाह घडून प्रजनन क्रियेत अडथळा निर्माण होतो. म्हणजेच जनावरे अगदी योग्य वेळी माजावर येतात पण गाभण ठरत नाहीत. सुप्त गर्भाशय दाह घडू नये आणि तो अनपेक्षितरीत्या प्रसूतीनंतर झाल्यास तत्काळ बरा करण्याबाबत पशुपालकांनी काळजी घ्यावी.

प्रसूतीनंतर दररोज जनावरांचे तापमान नोंद करणे आणि त्यांच्या गर्भाशयातून येणारा स्राव लक्षपूर्वक पडताळणे गरजेचे असते.सामान्यपणे सुलभ प्रसूती झालेल्या जनावरात आरोग्य अबाधित असण्याची शक्यता असते. कष्ट प्रसूती झालेल्या जनावरात गर्भाशय दाह होण्याची शक्यता असते. कष्ट प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्ववत येण्यासाठी मदत करणारे, रोग प्रतिबंधासाठी प्रतीजैविकांचा, ऊर्जा वाढवणारा उपचार पशुतज्ज्ञांकडून करून घ्यावा.

बाह्य लक्षणांच्या नोंदीवरून सुप्त गर्भाशयदाहाचा धोका ओळखता येतो. जनावरांचे समोरून निरीक्षण केल्यास त्यांचा श्‍वास, भूक, वागणूक, कान-डोळ्यांची त्वचा, ओठावरचा ओलेपणा याबाबत व पाठीमागून निरीक्षण केल्यास स्राव, शेण, कासेचे भारलेपणा, शेपूट धरण्याची ठेवण कळू शकते. या नोंदीवरून दिसून येणारा फरक ज्या पशुपालकांना कळू शकतो त्यांना सुप्त गर्भाशयदाह थांबविणे आणि त्यासाठी योग्य उपाययोजना करणे शक्य होते.

ज्या जनावरांना प्रसूतीनंतर ताप आला नाही, त्यांचा स्राव वासरहीत असेल तर त्या जनावरांची भूक किती आहे ते पाहावे. भूक भरपूर असणारी जनावरे आरोग्य टिकवून आहेत असे सिद्ध होते.भूक कमी असणारी जनावरे दूध उत्पादनाशी निगडित दुग्ध ज्वर, किटोसिस आजाराची लक्षणे दाखवितात. क्षार कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांच्या तपासणीचे निष्कर्ष, पशू तपासणी, योग्य निदान घडून आल्यास खात्रीशीर उपाय, योग्य उपचार योजणे शक्य होते. सुप्त गर्भाशय दाह रोखण्याची शक्ती शरीरात निर्माण करणे शक्य होते.

प्रसूतीनंतर ज्या जनावरांना ताप येत नाही, मात्र स्राव हा दुर्गंधीत आहे अशा वेळी तत्काळ उपचार करावेत. या प्रकारात सुप्त गर्भाशय दाह होण्याचा धोका असतो.प्रसूतीनंतर ताप दिसून येणाऱ्या जनावराचा स्त्राव वासरहित असल्यास कासदाह, फुफ्फुस दाह असण्याची शक्यता असते. सुप्त गर्भाशय दाह व सुप्त कासदाह यांचा सरळ संबंध आहे. प्रसूतीनंतर १०३ अंश फॅरनाहाइटपेक्षा जास्त ताप हा सुप्त गर्भाशय दाह आणि सुप्त कासदाहासाठी धोक्याचे लक्षण आहे.

गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढविणे, रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणे, रोगजंतूंचा फैलाव थांबविणे,जास्तीत जास्त स्राव निर्माण करून गर्भाशयातील अशुद्ध बाबी बाहेर टाकणे, गर्भाशयास कळा निर्माण करणे अशा तत्त्वावर आधारित उपचार पद्धती सुप्त गर्भाशय दाह थांबविणे, बरा करणे, रोखणे यांसाठी वापरता येते. यासाठी प्रसूतीनंतर १५ दिवस जनावरांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT