Pune News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर झाली असताना, हरकती दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने घातलेल्या कठोर नियमांमुळे मतदार आणि राजकीय पक्ष दोघेही संभ्रमात सापडले आहेत. फक्त दोन प्रकारच्या वैयक्तिक हरकतीच स्वीकारल्या जाणार असल्याने मोठ्या प्रमाणातील दुबार आणि बनावट नावे काढणे जवळपास अशक्य झाले आहे. यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी मतदार यादीतील त्रुटी हा मोठा राजकीय वाद ठरण्याची शक्यता आहे..फक्त दोन प्रकारच्या हरकती स्वीकारल्या जाणारराज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार मतदार यादीत फक्त पुढील दोनच प्रकारच्या हरकती घेतल्या जातील –स्वतःच्या नावात दुरुस्ती करण्याचा अर्ज (नमुना ‘अ’)एखाद्या विशिष्ट मतदाराच्या नावावर हरकत (नमुना ‘ब’).Voter List Glitch: मतदारयादीत महिलेचं नाव सहा वेळा; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश.यामुळे शेकडो किंवा हजारो संशयास्पद नावांची एकत्रित यादी पक्षांनी सादर करावी, असा प्रयत्न पूर्णपणे अवैध ठरणार आहे. “एकगठ्ठा स्वरूपातील हरकत स्वीकारली जाणार नाही,” हे आयोगाने स्पष्ट केलं आहे..स्वतःच्या नावात दुरुस्ती कशी करावी?नाव यादीत नसेल, चुकीच्या प्रभागात असेल किंवा नाव, लिंग, वय यामध्ये त्रुटी असल्यास संबंधित मतदाराने नमुना ‘अ’ भरून वीज बिल, भाडेकरार किंवा ओळखपत्र अशी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील..Voter List : अहिल्यानगरमध्ये पाच वर्षांत वाढले पावणेतीन लाख मतदार .दुसऱ्याच्या नावावर हरकत कशी?फक्त त्या प्रभागातील मतदारालाच नमुना ‘ब’ भरून हरकत नोंदवता येईल, आणि एका हरकतीत फक्त एकाच व्यक्तीचे नाव नमूद करता येणार आहे. हरकत मान्य किंवा फेटाळण्यापूर्वी संबंधित मतदाराला नोटीस पाठवून त्याचे म्हणणे ऐकणे आयोगासाठी बंधनकारक आहे..राजकीय पक्षांवर बंधनेराजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात दुबार किंवा बनावट नावे शोधून थेट हरकती दाखल करण्याचा अधिकारच दिलेला नाही. ते फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिक पातळीवर हरकती दाखल करण्यास सांगू शकतात..यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार यादीतील त्रुटी हा एक मोठा वादाचा मुद्दा ठरू शकतो. राजकीय पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक हरकती दाखल करतील की न्यायालयात जातील, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.