Milk production
Milk production Agrowon
ॲनिमल केअर

Milk Production : दूधवाढीसाठी दिले ऑक्सिटोसिन औषध

टीम ॲग्रोवन

पुणे : गाई, म्हशींच्या दूधवाढीसाठी (Milk Productivity) त्यांना ऑक्सिटोसिन (Oxytocin Injection) हे औषध दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला. तसेच ऑक्सिटोसिन या औषधांचा साठा करून तो शहर, जिल्ह्यासह राज्यातील गाई-म्हशींच्या मालकांना विक्री करणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक, विमानतळ पोलिस ठाणे, अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये तब्बल ५३ लाख ५२ हजार रुपये किमतीचा ऑक्सिटोसिन औषधांचा साठा जप्त करण्यात आला.

समीर अन्वर कुरेशी (वय २९, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्‍वजित सुधांशू जाना (वय ४४, रा. पुरबा बार, विलासपूर, पुरबा मदीनीनपूर, पश्‍चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (वय २७, तिराईपूर, पश्‍चिम बंगाल), सत्यजित महेशचंद्र मोन्डल (वय २२, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्‍चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (वय ३२, रा. नलपुरकुर, मंडाल, पश्‍चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याविरुद्ध संगमनत करून फसवणूक, प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे तसेच विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकारी सुहास सावंत यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील कलवड वस्ती येथे गाई, म्हशी यांचे दूध वाढीसाठी (पाणवणे) ऑक्सिटोसिन औषधांचा वापर केला जात असून या औषधाचा बेकायदा साठा करून ठेवल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी याबाबत ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली.

पोलिस तसेच एफडीएच्या पथकाने शनिवारी लोहगावमधील कलवड वस्ती तेथे छापा टाकला. तेथील पत्र्याच्या शेडमध्ये खोक्‍यांमध्ये ऑक्सिटोसिन औषधांचा साठा केल्याचे उघडकीस आले. पथकांनी तेथून तब्बल ५३ लाख ५२ हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला. सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, मनोज साळुंके यांच्यासह ‘एफडीए’चे सहायक आयुक्त दिनेश खिंवसरा, आतिष सरकाळे, सुहास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कुरेशीकडून राज्यभरात विक्री

समीर कुरेशी हा मुख्य संशयित आरोपी आहे. त्याने त्याच्या इतर साथीदारांशी संगनमत करून संबंधित ठिकाणी ऑक्सिटोसिनचा औषधसाठा करून ठेवला होता. तेथूनच कुरेशी हा शहर, जिल्हा व राज्याच्या वेगवेगळ्या भागातील गोठे मालकांना ऑक्सिटोसिन औषधाचा पुरवठा करीत होता. संबंधित औषधाची मात्रा तयार करून ते औषध इंजेक्‍शनद्वारे गाई, म्हशींना देण्यात येत असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. ऑक्सिटोसिन हे हार्मोन असून, त्याचा वापर प्रसूती सुरळीत करण्यासाठी केला जात असल्याचे औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी सांगितले.

ऑक्‍सिटोसीनमुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम

- अशक्तपणा

- दृष्टीविकार

- पोटाचे आजार

- नवजात बालकांना कावीळ

- गर्भवती महिलेस रक्तस्राव

- अनैसर्गिक गर्भपात

- श्‍वसन व त्वचेचे विकार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT