विमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे बंधनकारक असते. Agrowon
कृषी पूरक

पशुधनाचा विमा का काढावा ?

पशुधन निरोगी असून, ठराविक वयोगटातील असल्यासच त्यांचा विमा काढता येऊ शकतो. पशुधनाचे योग्य वेळी लसीकरण झालेले असल्यास पशुपालक त्यांचा विमा उतरवू शकतात.

Roshani Gole

पशुपालनाचा व्यवसाय करीत असताना पशुधनाला विविध प्रकारच्या आजारांची बाधा होत असते. आजाराची तीव्रता जास्त असल्यास, जनावरांचा मृत्यु संभावतो. काही वेळेस अपघातामुळे जनावरे दगावतात. जनावरे दगावल्याने किंवा आजाराने मृत्यु झाल्यास पशुपालकांचे प्रचंड नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांचा विमा काढून घेतला पाहिजे.

पशुधन निरोगी असून, ठराविक वयोगटातील असल्यासच त्यांचा विमा (insurance) काढता येऊ शकतो. पशुधनाचे योग्य वेळी लसीकरण (vaccination) झालेले असल्यास पशुपालक त्यांचा विमा उतरवू शकतात. या सर्व गोष्टींची तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत तपासणी करूनच जनावरांचा विमा उतरवला जातो.

नवीन जनावरे खरेदी केल्यानंतर एका आठवड्याच्या आतमध्ये जनावरांचा विमा उतरवला पाहिजे. यासाठी खालील गोष्टींचे पालन करावे.

- विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

- जनावरांची पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

- विमा काढल्यानंतर जनावरांच्या कानात बिल्ला अडकविला जातो.

पशुधनाचा विमा काढताना भरावयाचा प्रीमियम रेट-

- २ ते १० वर्षे वयोगटातील दुभत्या गायीसाठी पशुपालकांना ४ % प्रीमियम रेट भरावा लागतो.

- ३ ते १२ वर्षे वयोगटातील दुभत्या म्हशींसाठी पशुपालकांना ४ % प्रीमियम रेट भरावा लागतो.

- ३ ते ८ वर्ष वयोगटातील वळूसाठी ४ टक्के प्रीमियम रेट द्यावा लागतो.

- ३ ते १२ वर्षाच्या बैलासाठीही ४ टक्के प्रीमियम रेट द्यावा लागतो.

- ४ महिने ते ७ वर्षाच्या शेळ्या-मेंढ्यासाठी ४ टक्के प्रीमियम रेट लागतो.

जनावर दगावल्यास काय करावे-

- त्वरित विमा कंपनीला संपर्क करून जनावर मृत झाल्याबाबत कळवावे.

- पशुवैद्यकाकडूनच जनावराचे शवविच्छेदन करावे.

- कानात बिल्ला असल्याबाबत खात्री करावी. जनावराचे छायाचित्र घ्यावे.

- पंचनामा करून अहवाल घ्यावा.

- जनावराची योग्य विल्हेवाट केल्याचे सरपंचाचे प्रमाणपत्र घ्यावे.

- मूळ बिल्ला विमा कंपनीला क्लेम फॉर्मसोबत द्यावा.

केंद्र सरकारच्या पशुधन विमा योजनेअंतर्गत देशी संकरीत गायी व म्हशी, पाळीव प्राणी, शेळ्या-मेंढ्या या जनावरांचा विमा काढला जातो. पशुधन विम्याच्या रकमेत शासनाचे ५० ते ७० टक्के अनुदान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Antyodaya Scheme: अहिल्यानगरमधील २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ

Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुरांना तातडीने मदत द्या : बाळासाहेब थोरात

Orange Damage: मृगबहार संत्राफळांचे नुकसान

Soybean Prices: हमीदरापेक्षा भाव वाढले, उत्पादन मात्र घटले

Leopard Attack: बिबट्याचा धुमाकूळ, पंढरपुरात १३ कोकरे, करमाळ्यात ५ मेंढ्या फस्त

SCROLL FOR NEXT