Artificial Insemination Time In Kalwad Agrowon
कृषी पूरक

कालवडीला केव्हा भरवून घ्यावी?

कालवडीने माजाची लक्षणे दाखविल्यानंतर माजाच्या कोणत्या अवस्थेत भरविल्यानंतर यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

Team Agrowon

पशुपालन व्यवसाय करीत असताना, गोठ्यातील मादी वासरांची (female calf) वाढ झपाट्याने होणे गरजेचे आहे. योग्य वाढ झाल्याने कालवडी (heifer) योग्य वयात माजाची लक्षणे (heat symtomps) दाखवायला सुरुवात करतात. कालवडीनी माजाची लक्षणे दाखविल्यानंतर योग्य वेळी रेतन केल्यास, गर्भधारणेची शक्यता वाढते.

कालवडी वयात येतात म्हणजे, त्यांचे ऋतुचक्र सुरु होत असते. या कालावधीमध्ये कालवडीच्या शरीरातील नैसर्गिक क्रियांचा वेग बदलतो आणि शरीर प्रजननासाठी तयार होत असते. या काळात शरीरात विविध संप्रेरके स्त्रवू लागतात. साधारणपणे गायी-म्हशींचे प्रजनन चक्र हे २१ दिवसांचे असते. म्हणजे दर २१ दिवसांनी कालवड पुन्हा माजाची लक्षणे दाखवीत असते. माजाची लक्षणे ठराविक चार अवस्थामध्ये दिसून येत असतात.

माजाची पूर्वअवस्था म्हणजे प्रोइस्ट्रस - हा कालावधी २ ते ३ दिवसांचा असतो. या अवस्थेत कालवडीच्या शरीरात फॉलीकल स्टीम्युलेटीग होर्मोन स्त्रवला जातो. या काळात स्त्रीबीज कोशातील बीजांडाची वाढ जोमाने होत असते. शरीरात इस्ट्रोजेन संप्रेरक स्त्रवून त्याचे रक्तातील प्रमाण वाढू लागते. ही अवस्था संपेपर्यंत कालवडीमध्ये माजाची लक्षणे दिसू लागतात.

दुसरी माजाची अवस्था म्हणजे इस्ट्रस- या अवस्थेत इस्ट्रोजेन संप्रेरकाचे प्रमाण वाढलेले असल्याने, जनावरे विशिष्ट माजाची लक्षणे दाखवायला लागतात. हा माजाचा कालावधी १८ ते २४ तासांचा असतो. या अवस्थेत कालवड वळू बरोबर संयोग करण्याचा प्रयत्न करते. इतर जनावरांनी येऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास, कालवड शांत उभी राहते. या अवस्थेत कालवडीच्या योनी मार्गावर सूज येते. योनी मार्गातून पांढरा स्त्राव स्त्रवू लागतो. माजाचा मध्य ते शेवटापर्यंतचा काळ हा कालवड भरविण्यासाठीचा योग्य काळ असतो. या काळात कालवडीला भरविल्यास यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

माज संपल्यानंतरची अवस्था म्हणजे मेटइस्ट्रस – कालवडीचा माज संपल्यानंतरच्या ३ ते ४ दिवसांच्या अवस्थेला मेटइस्ट्रस म्हटले जाते. माज संपल्यानंतर १० ते १२ तासात स्त्रीबीज फलनासाठी बाहेर पडत असते. कालवडी या अवस्थेत रक्तमिश्रित स्त्राव बाहेर टाकत असतात. या अवस्थेत जनावरांचा माजाचा कालावधी संपलेला असतो. या काळात कालवडीला इतर जनावरांनी सलगी करण्याचा प्रयत्न केल्यास कालवड प्रतिसाद देत नाही.

गर्भधारणा झालेली असल्यास फलित गर्भाच्या वाढीसाठी पूर्वतयारी होत असते. गर्भधारणा झालेली असल्यास शरीरात प्रोजेस्ट्रेरॉन संप्रेरकाचे प्रमाण वाढत असते. प्रोजेस्ट्रेरॉन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी स्त्रीबीजांड कोषावर कॉर्पस ल्यूटियम तयार होते. यातून स्त्रवणाऱ्या प्रोजेस्ट्रेरॉनमुळे गर्भाशयाचे गाभण काळात आकुंचन होत नाही त्यामुळे गर्भाचे रक्षण होण्यास मदत होते.

दीर्घ मुदतीची शेवटची अवस्था (डाईस्ट्रस)- कालवडीच्या माजाच्या चक्रातील ही शेवटची आणि दीर्घकाळ असलेली अवस्था आहे. ही अवस्था १४ ते १७ दिवसांची असते. गर्भधारणा झालेली नसल्यास, ही अवस्था अशीच पुढील माजाच्या अवस्थेपर्यंत टिकून राहते. आणि या काळात गर्भाशयाला पुढील चक्राकरिता तयार करीत असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT