शेततळ्यातील खतांची मात्रा कशी ठरवावी?

तलावातील खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास, तलावात वाढणाऱ्या माशांच्या वाढीसाठी योग्य पोषक घटकांचा पुरवठा होण्यास मदत होईल.
Fertilizer management of fish pond
Fertilizer management of fish pondAgrowon
Published on
Updated on

तलावातील खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास, तलावात वाढणाऱ्या माशांच्या (fish) वाढीसाठी योग्य पोषक घटकांचा पुरवठा होण्यास मदत होईल. जैविक किंवा सेंद्रिय खतांमध्ये पोल्ट्रीची (poultry) विष्ठा, डुक्करांची, बदकांच्या विष्ठेचा वापर केला जातो. यात प्रामुख्याने कोंबडी खत सेंद्रिय खत म्हणून वापरले जाते.

कोणतीही सेंद्रिय खते, पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यांचे जीवाणूद्वारे विघटन केले जाते. विघटन केल्यानंतरच माशांच्या वाढीसाठी आवश्यक असे पोषक घटक जसे कि, नायट्रोजन, फॉस्फोरस पोटॅशियम यांसारखी मूलद्रव्ये उपलब्ध करून दिली जातात. या मूलद्रव्याचा वापर करून पाण्यातील प्लवंगाची वाढ होत असते.

तलावात खतांचा वापर करताना शक्यतो ताज्या खतांचा वापर करावा. खते वापरायची मात्रा तलावाच्या एकूण आकारमानानुसार ठरवावी. काही वेळेस हे प्रमाण तलावातील पाण्याच्या प्रतीवर देखील अवलंबून असते. तलावात खते देत असताना युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट यासारख्या रासायनिक खताचाही वापर केला जातो.

तलावातील मातीच्या थरांमध्ये असणाऱ्या पोषणद्रव्यांच्या आधारे तलावांत खते देत असताना तीन टप्प्यात खते दिली जातात. यामध्ये जैविक खत एकूण खतांच्या २० ते २५ टक्के हे बीज साठवणुकीच्या १५ दिवस आधी पायाभूत मात्रा म्हणून द्यावे. उर्वरित खताची मात्रा दोन दोन महिन्याच्या अंतराने दोन वेळेस द्यावी.

पाण्यातील नायट्रोजनचे प्रमाण वाढविण्यासाठी अझोलाचा वापरही फायदेशीर ठरतो. अझोलाचा वापर ४० टन/ हेक्टर/वर्ष या प्रमाणात करू शकतो. तलावामध्ये वापरलेल्या पदार्थांचे विघटन झाल्यानंतर, उरलेल्या पदार्थांचा वापर मासे किंवा कोळंबीसाठी पौष्टिक खाद्य म्हणून केला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com