which symptoms are seen in bloat of animals 
कृषी पूरक

जनावरांमध्ये पोटफुगी झाल्यास दिसतात ही लक्षणे  

रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये पोटाचे विकार अधिक प्रमाणात दिसून येतात. पोटाच्या विकारामध्ये पोटफुगी, पोट गच्च होणे, अपचन यांसारख्या गोष्टी दिसून येतात.

टीम अॅग्रोवन

रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये पोटाचे विकार अधिक प्रमाणात दिसून येतात. पोटाच्या विकारामध्ये  पोटफुगी, पोट गच्च  होणे, अपचन यांसारख्या गोष्टी दिसून येतात. पोटातील वायू बाहेर न पडल्यामुळे जनावरांना होणारी पोटदुखी (bloat) अत्यंत त्रासदायक असते. हे विकार चाऱ्यातील बदलामुळे होत असतात,  सुरुवातीच्या अवस्थेत ओळखल्यास उपचारामुळे बरे देखील होतात. परंतु वेळेत उपचार (treatment) न केल्यास जनावर आजारी पडून दगावण्याची संभावना वाढते.

हेही पाहा-  जनावरांतील पोटफुगी- कारणे आणि उपाय

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटात खाद्याचे पचन होत असताना वायू निर्माण होत असतो. तो शरीराबाहेर न पडल्यामुळे जनावरांना पोटफुगी होते. परिणामी जनावर पोट्फुगीने आजारी पडते. लक्षणे

  • जनावरांच्या डाव्या अंगाकडील पोट पूर्णपणे फुगते आणि हाताने वाजविले असता आवाज घुमतो.
  • सुरुवातीस जनावरांचे चारा खाणे पूर्णपणे बंद होते.
  • जनावर दात खाते, पाठ ताणून उभे राहते.
  • फुफ्फुसाला इजा झालेली असल्यास श्वास घेण्यास त्रास होतो.
  • पोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडत असते वारंवार लघवी व शेण टाकते.
  • अधिक दुधाचे उत्पादन देणारी जनावरे व्यायल्यानंतर त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी मिळेल तो चारा खातात. अशा चाऱ्यातून त्यांच्या शरीरात  घातक गोष्टी जातात.
  • जनावरांना चारा व्यवस्थित खाता यावा या हेतूने पशुपालक चारा कटरने कापतात. मशीनमधून चाऱ्यात आलेले लहान वायरचे, तारांचे तुकडे जनावरांच्या पोटात जाण्याची संभावना असते.
  • जमिनीवरून गोळा करून तसाच चारा जनावरांना घातला जातो अशा वेळी त्यातून खिळा, वायर पोटात जाण्याची शक्यता असते.
  • जनावरांच्या शरीरात क्षार, खनिजांची (mineral mixture) कमतरता असल्यास लहान वासरे माती खातात किंवा गोठ्यातील भिंती चाटतात.
  • पावसाळ्यात भरपूर प्रमाणात हिरवा चारा (green fodder) उपलब्ध होत असल्यामुळे तो जनावरांना भरपूर प्रमाणात खाण्यास मिळतो आणि त्याचे व्यवस्थित पचन न झाल्याने वायू (gas) निर्माण होऊन पोट फुगते.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cow Protection Chaos: गोरक्षकांचा धुडगूस शेतकऱ्यांच्या मुळावर

    Shirala Nagpanchami: शिराळ्यात २३ वर्षांनंतर पुन्हा झाले जीवंत नागदर्शन

    Nandani Math Elephant: नांदणी मठाची ‘महादेवी’ दुरावली

    Pandharpur Flood: पंढरपुरात चंद्रभागेला पूरस्थिती, मंदिरे पाण्याखाली

    Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ची पडताळणी सुरूच ठेवा: मुख्यमंत्री फडणवीस

    SCROLL FOR NEXT