What Kind of Platform test are performed at milk collection centre? 
कृषी पूरक

दूध संकलन केंद्रावर कोणत्या प्लॅटफॉर्म टेस्ट केल्या जातात?

दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करताना कच्च्या दुधाची प्रत महत्त्वाची ठरते. भारतातील दूध उत्पादन हे प्रामुख्याने ग्रामीण भागात होत असल्याने हे दूध विविध शीत पुरवठा साखळीमधून शहरांकडे आणले जाते.

टीम अॅग्रोवन

दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करताना कच्च्या दुधाची गुणवत्ता महत्त्वाची ठरते. भारतातील दूध उत्पादन हे प्रामुख्याने ग्रामीण भागात होत असल्याने हे दूध विविध शीत पुरवठा साखळीमधून (cold storage chain) शहरांकडे आणले जाते. हेही पाहा-  दुधातील भेसळ ओळखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात ?

वाहतुकीमुळे दुधाची प्रत खालावण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दुधाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देले पाहिजे. दूध संकलन केंद्रावर काही ठराविक प्लॅटफॉर्म टेस्ट (Platform test) करूनच दूध स्वीकारले जाते.  

  • दुधाचा वास (Flavour)- दूध ताजे आहे की शिळे हे जाणून घेण्याकरिता प्लॅटफॉर्म दूध प्लंजरच्या सहाय्याने ढवळून दुधाचा वास घेतला जातो.
  • चव (Taste)- दुधातील लॅक्टोज नावाच्या शर्करेमुळे दुधाला नैसर्गिक गोडसर चव येत असते. दुधाचे तापमान वाढल्यास या शर्करेचे आम्लात विघटन होऊन दुधाला आंबटसर चव येते.
  • दुधाचे तापमान (Temperature) - दूध प्रक्रिया केंद्रात बरेचदा दूर अंतरावरील शीतगृहातून येत असते. दुधाच्या तापमानात वाढ झाल्यास दुधातील जीवाणूंची संख्या वाढू लागते.
  • लॅक्टोमीटर रीडिंग (LActometer reading) - दुधातील स्निग्धांश वगळता अन्य घटक हे दुधातील स्निग्धांशाइतकेच महत्त्वाचे आहेत. दुधात केली जाणारी पाण्याची आणि इतर घटकांची भेसळ या टेस्टवरून ओळखली जाते.
  • आम्लता (Acidity)- दुधाच्या तापमानात वाढ झाल्यास दुधाची आम्लता वाढीस लागते. सर्वसाधारणपणे गायीच्या दुधाची आम्लता ०.१२ ते ०.१४ तर म्हशीच्या दुधाची आम्लता ०.१४ ते ०.१६ एवढी असते. दुधाची आम्लता यापुढे वाढल्यास दूध खराब होण्याची शक्यता असते.  
  • क्लॉट ऑन बॉयलींग टेस्ट (Clot on Boiling Test)- दुधाची आम्लता जर जास्त असेल तर उकळताना ते फाटते. या चाचणीकरिता एका परीक्षानळीत साधारण ५ मिली एवढे दूध घेऊन परीक्षानळी उकळत्या पाण्यात धरावी.  उकळल्यानंतर जर दूध फाटले नाही तर असे दूध पुढील प्रक्रिया करण्यास योग्य समजावे.
  • या चाचण्या दूध संकलन केंद्राच्या प्लॅटफार्मवरच घेतल्या जातात. त्यामुळे त्यांना ‘प्लॅटफॉर्म चाचणी’ असे म्हणतात.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Pauas Andaj: काही भागात हलक्या पावसाचा अंदाज; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

    Cooperative Bank Jobs: भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी ७० टक्के जागा राखीव

    Yashwantrao Krishi Mahotsav: राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवाला प्रतिसाद

    Ratnagiri Farmers Crop Loss : रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजारांवर शेतकऱ्यांचे ७७२ हेक्टरचे नुकसान

    Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २१ निर्णय; अतिवृष्टीच्या मदतीवरून खडाजंगी

    SCROLL FOR NEXT