साधारणपणे सूक्ष्म जीवाणु (micro-organisam) म्हटले की, आजारास कारणीभूत घटक अशी त्यांची ओळख आहे. पण काही सुक्ष्मजीवाणू आरोग्याच्या हिताचे असतात. दह्यातील (curd) सुक्ष्मजीवाणु म्हणजे जिवंत असलेले चांगले सूक्ष्मजीव. जे आतड्यातील आजार (intestinal disease) उद्भवणाऱ्या जीवाणूंची वाढ प्रतिबंधित करतात. पोटातील रोगसंक्रमण व इतर पोटासंबंधी संक्रमणापासून आपले संरक्षण करतात. यासोबतच पोटाचे अल्सर (stomach ulcer) आणि कर्करोगापासून रक्षण करून आरोग्यवर्धक ठरतात.
दह्यातील जीवाणू आतड्यामध्ये शरीरास आवश्यक असलेल्या जीवाणूंची वाढ करतात. ज्यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. यासोबत आतड्यामधील इतर अन्नघटकांपासून खनिजे, पोषक तत्वांची शोषण्याची क्षमता देखील वाढवितात.
ज्या लोकांना लॅक्टोजची ऍलर्जी असते, जे दुधाचे सेवन करू शकत नाहीत, अशा लोकांना दह्याच्या आहारात समावेश करता येईल. दह्यामध्ये दुग्धशर्करेचे जीवाणूंच्या सहाय्याने सुक्ष्म घटकांमध्ये रुपांतर केलेले असते. त्यामुळे दुग्धशर्करा न पचवू शकणारे लोक दुधातील हे सर्व पौष्टिक घटक दह्याच्या माध्यमातून मिळवू शकतात.
दह्यात कॅल्शियमची मात्रा अधिक असते. ज्यामुळे हाडांची झीज रोखता येते. हाडे मजबूत होण्यास मदत होते. कॉर्टिझॉल हार्मोनच्या असमतोलामुळे शरीरात उच्च रक्तदाब, लठ्ठपणा व इतर रोगांची बाधा होते. दह्यातील कॅल्शियम हे चरबीच्या विभाजनात मदत करते. दह्यातील कॅल्शियम हे शरीरातील चरबी पेशींना जास्त कॉर्टिझॉल पुरविण्यासाठी प्रतिबंधित करते व त्याचे संतुलन राखण्यास मदत करते.
दह्यातील कॅल्शियम दात मजबूत करण्यासाठी देखील मदत करते. तसेच दह्यातील जीवाणू प्रामुख्याने लॅक्टोबॅसिलस हे दातांमधील कॅव्हीटीचा धोका कमी करतात. दातांचे आरोग्य सुधारतात. दही शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
जीवनसत्व बी-१२ हे प्रामुख्याने मांसाहारी पदार्थामध्ये आढळून येते. हे जीवनसत्त्व दह्यात देखील आढळते. म्हणून दही शाकाहारी लोकांमध्ये रक्तनिर्मिती आणि मज्जातंतूचे काम सुधारण्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.