प्रोबायोटिक दही म्हणजे काय?

अन्नपदार्थामध्ये मानवी आरोग्यासाठी लाभदायक जिवंत जिवाणू विशिष्ट प्रमाणात मिसळले असता, त्यास ‘प्रोबायोटिक पदार्थ’ म्हणतात.
Probiotic Curd
Probiotic Curd
Published on
Updated on

प्रोबायोटिक्स म्हणजे आपल्या आरोग्यासाठी हातभार लावणारे चांगले जीवाणू. जीवाणू म्हणजे बक्टेरिया म्हटलं, की ऐकायला काहीसं विचित्र वाटतं..! पण आपल्या पोटात असे ‘चांगले’ जीवाणू असणं गरजेचं असतं. कारण त्यांच्या मार्फतच आपल्या शरीरात पचन होत असते. म्हणजेच ते पचनास मदत करतात. याव्यतिरिक्त जीवनसत्त्व बी-१२ च्या शोषणासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, वाईट जीवाणूंचा प्रतिकार करण्यासाठी प्रोबायोटिक्स गरजेचे आहेत. बरेचदा खाण्यातील किंवा वातावरणातील बदलामुळे आपल्याला व्हायरल इन्फेक्शन झालंय असं डॉक्टर सांगतात. अशा वेळेस डॉक्टर आपल्याला अँटिबायोटिक्स देतात. अँटिबायोटिक्समुळे शरीरातील वाईट जीवाणूंबरोबर चांगले जीवाणूही नष्ट होत असतात. मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी आतड्याची प्रणाली चांगली असावी लागते. मानवी आतड्यामध्ये अनेक जीवाणू असतात. त्यामधील काही जीवाणू हानिकारक असतात तर काही आरोग्यासाठी चांगले असतात.

हेही पाहा-चांगल्या अारोग्यासाठी - प्रोबायोटिक्स पदार्थ   आपल्या जीवनशैलीचा विचार करता प्रोबायोटिक पदार्थ आपल्या आहारात असले पाहिजेत. अपुरी झोप, अँटिबायोटिक्सचं सेवन, अपुरी पोषणमूल्यं यामुळे शरीरातले चांगले जीवाणू कमी होऊन जातात. म्हणूनच आहारातून प्रोबायोटिक्सचा समावेश करण गरजेचं आहे. प्रोबायोटिक पदार्थ- दही-योगर्ट, आंबट पेय मानवी शरीराला फायदेशीर आहेत. प्रोबायोटिक (Probiotic) पदार्थ बनविताना लॅक्‍टोबॅसिली (lactobasili) आणि बायफिडो (Bifido) बॅक्‍टेरियम हे दोन प्रकारचे सूक्ष्म जीवाणू महत्त्वाचे आहेत.

हेही पाहा-  दही आणि योगर्ट बनविण्याच्या पद्धती विभिन्न प्रोबायोटिक दह्याचे फायदे - - रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. - अतिसारापासून बचावासाठी. - पोटाचे, आतड्याचे आजार कमी करण्यासाठी. - ताणतणाव, रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यासाठी. - ॲलर्जी, मूत्रमार्गाचे, आतड्याचे आजार टाळण्यासाठी.

अन्नपदार्थामध्ये मानवी आरोग्यासाठी लाभदायक जिवंत जिवाणू विशिष्ट प्रमाणात मिसळले असता, त्यास ‘प्रोबायोटिक पदार्थ’ म्हणतात. दह्यामध्येही असे लाभदायक जिवाणू मिसळल्यास प्रोबायोटिक दही तयार करता येते. घरगुती दह्यामध्ये उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण कमी अधिक असू शकते म्हणून त्यास प्रोबायोटिक दर्जा दिला जात नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com