animal disease 
कृषी पूरक

जनावरांमधील क्षयरोगामध्ये कोणती लक्षणे दिसतात?

जनावरांतील क्षयरोग हा 'मायक्रोबॅक्टेरियम बोवीस' या जिवाणूमुळे होतो. जनावरांतील क्षयरोग हा जीवाणूजन्य असून तो झुनॉटीक आजार आहे. या रोगाची लक्षणे दिसण्याआधीच संसर्ग होऊन महिने, वर्षे उलटून गेलेली असू शकतात.

टीम अॅग्रोवन

जनावरांतील क्षयरोग हा 'मायक्रोबॅक्टेरियम बोवीस' या जिवाणूमुळे होतो. जनावरांतील क्षयरोग हा जीवाणूजन्य असून तो झुनॉटीक आजार (zonotic disease) आहे. या रोगाची लक्षणे दिसण्याआधीच संसर्ग होऊन महिने, वर्षे उलटून गेलेली असू शकतात. लक्षणे –        जिवाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर सुरवातीच्या काळात जनावरांमध्ये कुठलीही लक्षणे दिसत नाही. क्षयरोगाचा (Tubercolisis) प्रादुर्भाव शरीराच्या कुठल्या अवयवावर होऊ शकतो. त्यानुसार लक्षणे दिसतात किंवा बरेचदा दिसत नाहीत. परंतु जनावराची उत्पादकता मात्र कमी होते. ·हेही पाहा-जनावरांना पावसाळ्यात होणारे आजार, प्रतिबंध आणि उपचार पद्धती

       श्वसनाद्वारे या जीवाणूचा शरीरात प्रवेश झाला असल्यास जीवाणू थेट श्वसननलिका व फुफ्फुसामध्ये प्रवेश करतो. जनावरांची कातडी निस्तेज होते, चमक नाहीशी होऊन हळूहळू मलूल होते. शरीराचे तापमान सारखे बदलत राहते. ताप असून सुद्धा जनावर खाणे बंद करत नाही, याउलट भूक वाढून अधिक खात राहते. त्यामुळे जनावरांच्या आजाराचे निदान करणे अवघड जाते. ·         जनावराचे वजन कमी होते, जनावर अशक्त (weak) बनते, दूध उत्पादन कमी होते. फुफ्फुसाचा संसर्ग असेल तर कमी तीव्रतेचा खोकला येतो, घशावर दाबून हात फिरवल्यानंतर खोकल्याची उबळ येते. जनावरांना धाप लागून श्वासोच्छ्‌वास भात्याप्रमाणे सुरू होतो. नाकावाटे पिवळसर स्त्राव  वाहतो तो वाळून त्याची पापुद्रे नाकाभोवती जमा होतात. गर्भाशयाला जिवाणूंची बाधा झाल्यास कोणतेही लक्षण न दाखवता जनावर गाभण राहत नाही. वारंवार उलटते, जर चुकून गाभण राहिले तर गर्भपात होतो. काही वेळा माजावर येण्याचे बंद होते. माज नसतानाही योनीतून पिवळसर स्राव वाहताना दिसतो. ·         जनावरांच्या लसिका ग्रंथी सुजतात, फुटतात त्यातून रवाळ पू वाहतो. कासेमध्ये प्रादुर्भाव झाल्यास कास दगडी होते, दूध बंद होऊन कासेमध्ये गळू होतात व फुटतात. दूध कायमचे बंद होऊ शकते.

कासेला क्षयरोगाची बाधा झालेली असेल तर जनावर व्यायल्यानंतर (calving) ते दूध वासराने पिल्यास वासरास क्षयाची बाधा होते. तसेच ते दूध न तापवता पिल्यास माणसामध्येही बाधा होऊ शकते.         जनावरांवर ताण आल्यास, वातावरणातील बदलामुळे क्षयरोगाची लक्षणे तीव्र होत जातात. धूळ, अतिथंडी यामुळे फुफ्फुसाचा क्षयरोग (TB) संसर्ग असेल तर क्षयरोग जिवाणूंची वाढ होऊन फफ्फुसावर परिणाम होतो. श्वासोच्छ्‌वास करणे अवघड होते. लसिका ग्रंथीना सूज येऊन त्यांचा आकार वाढतो. त्याचा दाब निर्माण होऊन श्वास घेणे आणि सोडणे त्रासदायक होते. बऱ्याचदा श्वसन नलिकेवर दाब येऊन पोट देखील फुगते. प्रतिबंधात्मक उपाय

  • ठराविक कालावधीनंतर गोठ्यातील जनावरांची चाचणी करून घ्यावी.
  • रोगग्रस्त जनावरांना कळपापासून वेगळे करावे.
  • योग्य जंतुनाशकांचा वापर करून गोठा व इतर उपकरणे वेळोवेळी निर्जंतुक करून घ्यावी.
  • कोणत्याही नवीन खरेदी केलेल्या जनावरांना कळपात घेण्यापुर्वी २ महिने विलगीकरण करावे.गायीला क्षयरोगाची बाधा असल्यास वासराला वेगळे करून मिल्क रिप्लेसर द्यावे.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा शब्द पाळू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेतकऱ्यांना आश्वासन

    Inspiring Farmer Story: सुखी संसाराची वाट शोधणारे दाम्पत्य

    BJP Mumbai President: भाजपकडून आमदार अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी

    Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा कोणताही विचार नाही

    Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

    SCROLL FOR NEXT