Vaccination Schedule Of Animals 
कृषी पूरक

गायी-म्हशींमध्ये विविध रोगाविरुद्ध लस कधी द्यावी?

कोणताही आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा या युक्तीने पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांचे व्यवस्थापन केल्यास जनावरांवरती होणाऱ्या अधिकच्या खर्चात बचत होऊ शकते

रोशनी गोळे

कोणताही आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा, 'उपचारापेक्षा प्रतिबंध बरा' या युक्तीने पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांचे व्यवस्थापन केल्यास जनावरांवरती होणाऱ्या अधिकच्या खर्चात बचत होऊ शकते. काही वेळेस तर अत्यंत खर्चिक उपचार करून देखील जनावर वाचेल की नाही याबाबत साशंकता असते आणि जरी वाचले तरी उत्पादनक्षमता पूर्वीइतकी राहत नाही. जसे लाळ्या खुरकुत रोगाची बाधा झाल्यानंतर ही जनावरे पुन्हा शेतीकामासाठी वापरण्यास निर्बंध येतात. ब्रुसेलोसिससारख्या आजारात तर गाभण जनावरांचा गर्भपात होतो. वर्षाला किंवा दीड वर्षाला एका वासराचे उत्पन्न मिळत नाही.

हेही पाहा- फऱ्या, तिवा, घटसपर् रोगाची लक्षणे अोळखा - लाळ्या खुरकुत रोगासाठी प्रथम लसीची मात्रा ३ महिन्याच्या वरील वासरास सप्टेंबर   आणि मार्च मध्ये द्यावी. पुढे दर सहा महिन्याच्या अंतराने म्हणजे वर्षातून दोनदा लाळ्या खुरकुत रोगप्रतिबंधक लस दिली पाहिजे. - घटसर्प रोगासाठीही प्रथम लसीची मात्रा तीन महिन्याच्या वरील वासरास प्रथम देऊन त्यानंतर दर सहा महिन्याच्या अंतराने वर्षातून दोनदा लस द्यावी.

हेही पाहा- जनावरांचे लसीकरण वेळेतचं का?

- फऱ्या रोग ज्याला आपण एक टांग्या असंही म्हणतो, याची लस तीन महिन्याच्या वरील वासरास प्रथम देऊन पुढे दर सहा महिन्याच्या अंतराने द्यावी. - थायलेरियासिस म्हणजेच गोचीड ताप याविरुद्ध लसीकरण वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी करून घ्यावं.

- ब्रुसेलोसिस मध्ये जनावरांमध्ये गर्भपाताची समस्या दिसून येते. जनावरे म्हणजे वासरे ४ ते ८ महिन्याची असताना आयुष्यात एकदाच या रोगाविरुद्ध लसीकरण करावे लागते. ही लस फक्त मादी वासरांनाच द्यावी कारण गर्भपात मादी जनावरांमध्ये दिसून येतो. हे वय निघून गेल्यास पुन्हा ही लस देता येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan Distribution: परभणी जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण

Office Assets Seized: अकलूज प्रांताधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त

Livestock Summer Impact: उष्णतेचा पशुधनालाही फटका

Rural Water Crisis: रायगडाच्या पायथ्याशी जलसंकट

China Urea Prodcuation: चीनमध्ये युरियासाठी कोळशाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT