नांदेड, परभणी, हिंगोलीत यंदा ७१४ क्विंटल रेशीम कोष उत्पादन 
कृषी पूरक

मराठवाड्यात ३२७ टनांनी वाढले रेशीम कोष उत्पादन

बीडची आघाडी, उस्मानाबाद क्रमांक दोनवर तर जालना तिसऱ्या स्थानी

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात रेशीम कोष उत्पादन तब्बल ३२७ टनांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक कोष उत्पादन करत बीडने कोष उत्पादनात आघाडी घेतली असून, उस्मानाबाद क्रमांक दोन तर जालना क्रमांक तीनचा रेशीम कोष उत्पादक जिल्हा ठरला आहे.
मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांतील शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग हा शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत ठरला आहे. मराठवाड्यात तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांनी रेशीम कोष उत्पादनात क्रांतीच्या दिशेने पाऊलवाट सुरू केली आहे. गतवर्षी २०२० २१ या आर्थिक वर्षात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ७ हजार ९२९ एकरांवर तुती लागवड होती. या ८ जिल्ह्यांत २८ लाख ८ हजार ३५० अंडीपुंज पुरवठा करण्यात आला होता. या अंडीपुंजांपासून १७५१ टन ऊस उत्पादन झाले होते.

यंदा २०२१ २२ या आर्थिक वर्षात मार्चअखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आठ हजार २७५ एकरांवर तुती लागवड झाली होती. या तुती लागवडीवर करण्यात आलेल्या रेशीम उद्योगासाठी ३१ लाख ७२ हजार ६५० अंडीपुंज पुरवठा करण्यात आला होता. या अंडीपुंजांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी २०७८ टन रेशीम कोषाचे उत्पादन केले आहे. मराठवाड्याच्या रेशीम विभागाचे उपसंचालक दिलीप हाके यांच्या मार्गदर्शनाखाली रेशीम विभागाची यंत्रणा रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते आहे. शिवाय विविध चॉकी सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या दर्जाच्या चॉकी पोहोचविणाऱ्या व्यक्तींचेही रेशीम कोष उत्पादन वाढिमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. यंदा मार्च २०२२ अखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आठ हजार ६४७ शेतकऱ्यांकडे ८९०४ एकरावर जुनी तुती लागवड असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

जिल्हानिहाय अंडीपुंज पुरवठा (२०२०-२१ व २०२१-२२)जिल्हा २०२०-२१---२०२१-२२ औरंगाबाद - २५१५५० - २७६१०० जालना- ३८८९५० - ३८९५०० परभणी - २१६००० - १९१३०० हिंगोली - ८५४०० - ६३९५० नांदेड- १६६००० - १८२६०० लातूर- १३८६०० - १४२७०० उस्मानाबाद- ५२२२५०- ५८७१५० बीड- १०३९६००- १३३९३५०

जिल्हानिहाय कोष उत्पादन टनांत (२०२०-२१ व २०२१-२२)जिल्हा- २०२०-२१ -२०२१-२२ औरंगाबाद - १५१ - १६६ जालना- २१५- २३३ परभणी- १२६ - १२१ हिंगोली- ४४ - ३० नांदेड- ९०- ११४ लातूर- ८५- ९६ उस्मानाबाद- ३८७- ३९९ बीड- ६५०- ९१४

अद्ययावत तसेच कमी खर्चिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत रेशीम कोष उत्पादक शेतकरी महाराष्ट्राला रेशीममध्ये अपारंपरिक राज्याकडून पारंपारिक राज्याकडे घेऊन जात आहेत. मिळणारे दर रेशीम कोष उत्पादकांना प्रोत्साहित करीत आहेत. सहायक संचालक (तुती),रेशीम संचालनालय नागपूर
- महेंद्र ढवळे,
रेशीममध्ये क्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या स्वीकारासोबत उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेशीम संचालनालयाच्या समन्वयातून रेशीमच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना रेशीम उद्योगासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे. उपसंचालक रेशीम, मराठवाडा
- दिलीप हाके,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT