शेळी म्हणजे गरीबाची गाय, असं आपण बरेचदा ऐकलंय. कारण शेळी निकृष्ट चाऱ्यावर स्वतःचं पालन-पोषण करू शकते. पण आता ही गरीबाची गाय गरीब मालकाच्या श्रीमंतीचं कारण बनू लागलीय. शेळयांना इतर जनावरांपेक्षा म्हणजे गायी-म्हशीपेक्षा कमी प्रमाणात खाद्य आणि जागा लागते. साधारणत: एका गायीला लागणार्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्पभूधारकांसाठी किंवा भूमीहीन शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरतो.
हेही पाहा- आजारी शेळ्यांची ओळख कशी करावी?
आपल्याकडे शेळीपालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केलं जातं. पण आता शेळ्यांच्या अनेक नवीन जाती विकसित झाल्या आहेत. त्या मांसाच्या उत्पादनाबरोबर दुधासाठीही वापरल्या जातात. बारबेरी ही अशीच शेळीची एक जात आहे.
हेही पाहा- ब्लूटंगचा प्रसार होतो या किटकामुळे
उत्तर प्रदेशात उगम असलेली ही जात आहे. पण ती विविध प्रकारच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. शिंगे मादी आणि नरामध्येही असून ती पिळलेली असतात. दाढी मात्र फक्त नरामध्येच आढळून येते. ही शेळी आकाराने लहान असते. पाय आखूड असतात. या शेळीचा बांधा लहान असतो. रंग पांढरा असून त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. यामुळे ती काहीशी हरणासारखी दिसते.
या शेळीची कास पूर्णपणे विकसित असून आकाराने मोठी असते. एका वेतात साधारण २५० ते ३०० लिटर इतकं दूध मिळू शकते. दररोज ही शेळी एक ते दीड लिटर दूध देते. दुधातील फॅटचे प्रमाण ४.६ % असते. दूध देण्याचा कालावधी साधारणतः १५० दिवस असतो. दीड वर्षाला दोन वेत मिळतात. या शेळीचा माजाचा कालावधी साधारणतः २४ ते ३६ तास असतो. दोन वेतातील अंतर ३४८-३५० दिवस असते. एक करडू जन्माला येण्याचे प्रमाण २३ %, जुळ्याचे प्रमाण-६४ % आणि तिळ्या करडाचे प्रमाण- १२ टक्क्यांपर्यंत असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.