गाभण जनावराची योग्य देखभाल महत्त्वाची Agrowon
कृषी पूरक

Cow Drying : गाभण गाय आटवण्याची योग्य वेळ कशी ठरवायची?

जनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची योग्य निगा आणि देखभाल हे जन्माला येणाऱ्या वासरांच्या दृष्टीन, गाई-म्हशींच्या पुढच्या वेतात दूध उत्पादनाच्या दृष्टीन, तसच दूग्धव्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीन अत्यंत महत्त्वाच आहे.

Team Agrowon

जनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची (Pregnant Cow) योग्य निगा आणि देखभाल हे जन्माला येणाऱ्या वासरांच्या दृष्टीन, गाई-म्हशींच्या पुढच्या वेतात दूध उत्पादनाच्या (Milk Production) दृष्टीन, तसच दूग्धव्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीन अत्यंत महत्त्वाच आहे.

गाईच्या प्रजनन व्यवस्थापनात गाय आटविण ही अत्यंत महत्वाची बाब आहे.  बऱ्याच पशुपालकांना गाय नेमकी केंव्हा आटवावी याची माहिती नसते.

गाय गाभण असून सुद्धा जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत काही पशुपालक गाईच दूध काढत राहतात. मात्र असं करण गाईच्या आरोग्याच्या दृष्टीन घातक आहे.

योग्य वेळी गाय आटविण्याचे फायदे काय आहेत? याशिवाय  गाय किंवा म्हैस केंव्हा आटवावी? याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिलेली माहिती पाहुया. 

योग्य वेळी गाय आटविण्याचे फायदे काय आहेत?

दूध आटवण्यामुळे दूध निर्मिती करणाऱ्या इंद्रियांना विश्रांती मिळते.

पुढील वेतात दूध निर्मितीसाठी लागणारी जीवनसत्वे , खनिजे शरीरामध्ये अधिक प्रमाणात साठुन राहतात.

खाद्यातुन मिळणारी जीवनसत्वे, खनिजे ही दूध निर्मितीसाठी खर्ची न पडता गर्भातील वासराच्या वाढीस उपयुक्त ठरतात.

विण्यापुर्वी गाईची प्रकृती सदृढ होते. 

गाय किंवा म्हैस केंव्हा आटवावी?

दुधातील गाय किंवा म्हैस विण्यापुर्वी कमीत कमी ६० दिवस अगोदर आटवावी असे केले नाही, तर पुढील वेतात त्या गाय किंवा म्हशीच दुध सध्याच्या वेतात देत असणाऱ्या दुधापेक्षा कमी होत हे लक्षात घ्यावं. 

गाय, म्हैस आटविण्यासाठी अर्धवट धार काढण, अनियमित धार काढण तसच आजीबात धार न काढण या प्रचलित पद्धती आहेत. 

आपल्या गाईची दूध उत्पादन क्षमता किती आहे. त्याप्रमाण कोणती पद्धत वापरावी याच नियोजन करुन तज्ज्ञांच्या सल्ल्यान गाय दुधातून आटवावी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: अमरावती जिल्ह्यातील तीन हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार

Agriculture Electric Pump: विद्युत पंपांच्या चोरीने शेतकरी त्रस्त

Unseasonal Rain: गारपीट, वादळी पावसाचा रब्बी पिकांना तडाखा; तातडीने मदतीची मागणी

Organic Vegetable Festival: कोल्हापुरात सेंद्रिय भाजीपाला महोत्सव

Sugar Production: साताऱ्यात १ कोटी ४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती

SCROLL FOR NEXT