Sharad Pawar on farmers Issuesकोल्हापूर : महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात आहे. सोयबीन पीक पूर्णपणे खराब झाले आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले. ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला..अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. पण अद्याप पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. प्रत्यक्ष मदत कधी पोहोचेल याकडे शेतकरी आशेने पाहात आहे. याकडे सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे पवार यांनी नमूद केले..Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी.शिवछत्रपतींच्या काळात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा शेतकऱ्यांकडे आधुनिक साधने नव्हती. शेतकऱ्यांकडे नांगरटणीसाठी फाळ नव्हता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपत्तीमधील सोने बाहेर काढले. सोन्याच्या फाळ तयार केला आणि त्याने नांगरट केली. असा दृष्टीकोन त्याकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. आताच्या सरकारने असाच दृष्टीकोन ठेवायला हवा, असेही ते म्हणाले. .Maharashtra Heavy Rainfall: अतिवृष्टीचा ३० जिल्ह्यांना फटका.गडकरींच्या इथेनॉल धोरणावर पवार काय म्हणाले?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी इथेनॉल धोरणाला काही घटकांकडून विरोध होत असल्याचे म्हटले होते. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, गडकरी यांच्या धोरणामुळे इथेनॉल उत्पादकांना बळकटी मिळत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनाही होत आहे. त्यामुळे इथेनॉल धोरणाला कोणी विरोध करत असेल वाटत नाही..१३५ कारखान्यांनी कामगारांचे ६०० कोटी थकवलेकाही वर्षापूर्वी राज्यभरात सहकारी कारखान्याचा दबदबा होता. त्यावेळी ७० टक्के कारखाने सहकारी होते. आती ही संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. अनेक कारखान्यांनी कामगारांच्या हिताविरोधात धोरण अवलंबले आहे. १३५ कारखान्यांनी कामगारांचे ६०० कोटी थकवले आहेत. अनेक कारखान्यांमध्ये ४० टक्के कामगार कंत्राटी आहेत. हे चित्र कामगारांच्या दृष्टीने चांगले नाही. कारखान्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे पवार यांनी सूचित केले..अमेरिकेने भारतावर लागू केलेल्या ५० टक्के आयात शुल्कावर (टॅरिफ) बोलताना पवार म्हणाले, केंद्र सरकारने आपल्या देशाच्या हिताच्या धोरणावर ठाम राहायला हवे. रशियाकडून स्वस्त तेल मिळत असेल तर घ्यावे. मी कृषिमंत्री असताना अमेरिकेने त्यांच्याकडून दूध आणि पशुखाद्य घ्यावे, असा आग्रह धरला होता. पण आम्ही तो मान्य केला नाही. आम्हाला तो परवडणारा नव्हता. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.