Jalgaon News: या आठवड्यात अनेक भागांत झालेल्या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकाची हानी होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. .पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू होईल, अशी स्थिती अनेक भागांत आहे. काही भागांत मध्यम व तुरळक, तर काही भागांत जोरदार पाऊस मागील काही दिवसांत झाला आहे. पावसाने शेतीकामे ठप्प आहेत. कारण काळ्या कसदार जमिनीत वाफसा नाही. वाफसा नसल्याने पीक कापणी, मळणी, कापूस वेचणीचे काम होऊ शकत नाही..हार्वेस्टर चालकांचा मळणीस नकारअनेक भागांत सोयाबीन पीक मळणीवर आहे. वाफसा नसल्याने मजूर पीक कापणी करून ते गोळा करून देण्याबाबत असमर्थता दाखवीत आहेत. दुसरीकडे वाफसा नसल्याने शेतात मोठे हार्वेस्टर पाठवून त्याद्वारे मळणी करणेही शक्य नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पीक मळणीवर आलेले असतानाच पाऊस आल्याने समस्या तयार होत आहेत..Soybean Crop Loss: अतिपावसाचा सोयाबीनला दणका.पाण्याचा निचरा होत नसल्याने पिकांवर परिणामखानदेशात कापूस प्रमुख खरीप पीक आहे. सुमारे साडेसात लाख हेक्टरवर कापूस पीक आहे. यात सुमारे दोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पीक आहे. त्यात पिकात वेचणीला सुरुवात झाली होती. परंतु पाऊस आल्याने वेचणीचे काम ठप्प झाले आहे..तसेच फवारणी, आंतरमशागत, तणनियंत्रण आदी कामेही ठप्प झाली आहेत. कापूस पिकात वेचणी होत नसल्याने पावसात बोंडे खराब होऊ लागली आहेत. त्यांचा दर्जा घसरू लागला आहे. कापसाला दर कमी आहे. यात पीक हाती येताच पावसाने नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. काळ्या कसदार जमिनीत पाणी साचले आहे. त्याचा निचरा होत नसल्याने वाफसा अनेक दिवस होणार नाही, अशीही स्थिती आहे..Rain Crop Damage: पावसाने फूलशेतीसह ऊस, भातपिकाचे प्रचंड नुकसान.वेचणीनंतर वाळवणूकही बंदकापूस वेचणीनंतर तो वाळवावा लागतो. कारण त्यात थंड, आर्द्रतायुक्त वातावरणामुळे ओलावा आहे. तो साठविण्यापूर्वी कोरडा करणे आवश्यक आहे. त्यासाठी निरभ्र वातावरण हवे आहे. परंतु स्वच्छ सूर्यप्रकाश नसल्याने अडचणी येत आहेत. कापूस वाळविता येत नसल्याने त्याचा दर्जा घरात खराब होण्याची भीती आहे..कापूस, सोयाबीन ही पिके हाती आली आहेत. मात्र पावसाने नुकसान होऊ लागले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास नुकसानीची पातळी आणखी वाढेल.दिलीप पाटील, शेतकरी, चोपडा, जि. जळगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.