How eggs are formed in hen body? 
कृषी पूरक

कोंबडीच्या शरीरात अंडे तयार होण्याची प्रक्रिया कशी असते?

ग्रामीण भागात अंडी उबविण्यासाठी खुडूक कोंबडी २१ दिवस बसवून पिलांची निर्मिती केली जाते. कोंबडीच्या शरीरात अंडे कसे तयार होते, हे समजून घेण्यासाठी कोंबडीची प्रजनन संस्था माहित असणे गरजेची आहे.

टीम अॅग्रोवन

ग्रामीण भागात अंडी उबविण्यासाठी खुडूक कोंबडी (Hen) २१ दिवस बसवून पिलांची निर्मिती केली जाते. कोंबडीच्या शरीरात अंडे (eggs) कसे तयार होते, हे समजून घेण्यासाठी कोंबडीची प्रजनन संस्था (Reproduction System) माहित असणे गरजेची आहे.  

हेही पाहा- व्हाईट लेगहॉर्न कोंबडी देते इतक्या अंड्याचं उत्पादन

अंडे कसे तयार होते  

  • पूर्णपणे वाढ झालेल्या मादीमध्ये (hen) स्त्रीबीजग्रंथी द्राक्षाच्या घडाप्रमाणे एकमेकास चिकटून असतात. 
  • त्यातील काही स्त्रीबीजग्रंथी आकाराने मध्यम ते मोठ्या आकाराच्या असतात. तर काही स्त्रीबीजग्रंथी आकाराने लहान असतात. 
  • मोठ्या स्त्रीबीजग्रंथीचा रंग पिवळा (yellow) असतो, तर लहान स्त्रीबीजग्रंथीचा रंग पांढरा (white) असतो. 
  • ज्या स्त्रीबीजग्रंथी आकाराने मोठ्या आणि रंगाने पिवळ्या असतात त्या पिवळ्या बलकावर स्त्रीबीज असते. 
  • पूर्णपणे वाढलेला पिवळा बलक स्त्रीबीजग्रंथीशी जोडलेल्या पापुद्र्यातून बाहेर पडून गर्भशयाकडे सरकू लागतो. 
  • अशा प्रकारे पिवळा बलक स्त्रीबीजासह गर्भाशयाच्या नरसाळ्यासारख्या भागात येतो. त्या नरसाळ्यासारख्या भागास इन्फंडीब्युलम (Infundibulum) म्हणतात. 
  • यानंतर पिवळा बलक पुढे सरकत सरकत मॅग्नममध्ये (Magnun) येतो. या ठिकाणी पांढरा बलक तयार होतो आणि पिवळ्या बलकच्या भोवती जमा होतो. 
  • मॅग्नमनंतर हे अंडे इस्तेमसमध्ये (Isthemus) येते. या इस्तेमसमध्ये अंड्याचा आकार तयार होतो. 
  • इस्तेमसमध्ये अंड्याला आकार येतो. नंतर हे अंडे युटेरसमध्ये (Uterus) येते. या युटेरसमध्ये क्षाराचे शोषण होऊन अंड्याच कवच तयार होते. 
  • युटेरसमध्ये तयार झालेले अंडे व्हजायना मार्गे अंड्याचा रुंद भाग पुढे सरकत सरकत क्‍लोएका व्हेंटमधून शरीराबाहेर पडते आणि वातावरणातील हवा, उष्णता लागून अंड्याचे कवच कठीण बनते. 
  • अंडी तयार होण्याची प्रक्रिया जवळपास २५ ते २६ तास चालत असते. अशा अंड्यापासून पिलांची निर्मिती शक्‍य आहेका? अर्थात नाही. कारण जोपर्यंत स्त्रीबीज आणि शुक्रजंतू यांचे मिलन होणार नाही तोपर्यंत नवीन जिवाची निर्मिती शक्‍य नाही. कारण अंडी देणे ही मादीची नैसर्गिक प्रक्रिया (natural process) आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
  • अशी अंडी उबवण्यासाठी वापरून काही उपयोग नाही. त्यातून पिल्लू बाहेर येणार नाही. हे समजून घेण्याआधी कोंबडीच्या प्रजनन संस्थेची माहिती असणे गरजेचे आहे. 

    general

    general

    general 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

    Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

    Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

    Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

    Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

    SCROLL FOR NEXT