buffalo
buffalo 
कृषी पूरक

म्हशी माजावर कधी येतात?

टीम अॅग्रोवन

भारतात गायीच्या तुलनेत म्हशी उशिरा वयात येतात. भारतामध्ये म्हशीच्या परड्या साधारणतः ३ ते ३.५ वर्षे वयाच्या झाल्यानंतर प्रजननक्षम होतात. दोन माजाच्या अंतरातील काळाला ऋतुचक्र म्हणतात.

म्हशींमध्ये ऋतुचक्राचा काळ (Cycle)चार टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे.

पहिली माजाची अवस्था – या अवस्थेला इंग्रजीमध्ये प्रोइस्ट्रस (proestrus) म्हणतात. हि अवस्था १ ते ३ दिवसांची असते.

दुसरी माजाची अवस्था – या अवस्थेचा कालवधी १२ ते २४ तास असून हिला इंग्रजीमध्ये ओइस्ट्रस (oestrus) असे म्हणतात. या अवस्थेत म्हशींमध्ये माजाची लक्षणे दिसू लागतात.

हेही पाहा - पंढरपुरी म्हैस कशी ओळखावी?

तिसरी माजाची अवस्था-  ही अवस्था १ ते २ दिवसांची असू शकते. या अवस्थेला मेटेइस्ट्रस (Metestrus) असे म्हणतात.  ही अवस्था ओळखून म्हशीला भरवून घेतल्यास यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते.

चौथी माजाची अवस्था-  ही सर्वात मोठी आणि शेवटची अवस्था असते. ती १४ ते १७ दिवसांची असू शकते. तिला इंग्रजीमध्ये डायइस्ट्रस (Diestrus) असे म्हटले जाते.

म्हशींमध्ये या चारही अवस्था पूर्ण होण्याकरिता २१ दिवसांचा कालावधी लागतो. म्हणजेच प्रजननदृष्ट्या सक्षम म्हैस दर २१ दिवसांनी माजावर येत असते. फेब्रुवारीनंतर उष्ण वातावरणामुळे म्हशींमध्ये माजाची लक्षणे कमी दिसतात किंवा काही वेळेस म्हैस मुक्या माजाची लक्षणे दाखवते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

Water Scarcity : नवीन जलकुंभ देखाव्यापुरता

SCROLL FOR NEXT