Zygograma insect helps to control Parthenium hystirophores grass  Agrowon
कृषी पूरक

कसा कराल गाजर गवताचा नायनाट ?

गाजर गवत जनावरांच्या पोटात गेल्यानंतर त्यांना विषबाधा होत असते. गाजर गवताला शास्त्रीय भाषेत पार्थेनियम हिस्टोरोफोरस म्हटल जाते.

Roshani Gole

जनावरांना चरायला सोडल्यानंतर जनावरे मिळेल ते गवत खात असतात. बरेचदा चरत असताना त्यांच्या खाण्यात गाजर गवत येते. गाजर गवत जनावरांच्या पोटात गेल्यानंतर त्यांना विषबाधा होत असते. गाजर गवताला शास्त्रीय भाषेत पार्थेनियम हिस्टोरोफोरस म्हटल जाते. आपल्याकडे गाजर गवताला चटक चांदणी, पांढरी फुली, ओसाडी या नावाने संबोधले जाते. याची पाने गाजराच्या गवतासारखी चिरलेली दिसतात. म्हणून याला गाजर गवत असे देखील संबोधले जाते.

साधारणपणे गाजर गवताचा (gajar gavat) प्रसार हा सर्वत्र झालेला दिसून येतो. कारण या झाडाला मोठ्या संख्येने फुले येत असतात. त्यापासून हजारोंच्या सहाय्याने बियांची निर्मिती होऊन त्यांचा प्रसार होत असतो. या गवताचा प्रसार शेतावरील बांध, पडीक जमीन, चराऊ जमीन यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो.

जनावरांनी गाजर गवत जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्यांना त्वचेचे रोग होतात. जनावरांमध्ये त्वचा खाजवणे, कावीळ यांसारख्या आजारांची बाधा होते. जनावरांनी गाजर गवत खाल्ल्याने दुधाची देखील चव बदलते. दुधाला कडवट चव येते. दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम झालेला दिसून येतो.

गाजर गवत चवीला काहीसे कडू असले तरी, भुक असलेले जनावर हे गवत खाते. गाजर गवत खाल्ल्याने उन्हाळ्यात जनावरांच्या शरीराचा जो भाग सूर्यप्रकाशाला जास्त सामोरा जातो. जसे की तोंड, पाठ, मान, डोळ्याच्या वरील भाग ओलसर होऊन अशा ठिकाणी खाज सुटू लागते. काहीवेळाने या भागातून एक द्रवरूप पदार्थ बाहेर येतो. शरीराला खाज सुटल्याने जनावरे शरीर झाडाला घासत असताना घासलेला भाग सडतो आणि गळून पडतो. नाकपुड्यांना सूज आल्याने श्वसनास त्रास होतो. अति प्रमाणात गाजर गवत खाल्ल्याने जनावरांचे मानसिक संतुलन बिघडते. चक्कर येणे सुरु होते. रातांधळेपणा येतो.

विषारी गवत कमी प्रमाणात खाल्ल्याने जनावरांचा मृत्यु होत नाही. मात्र अशा जनावरांचे दुधाचे सेवन करत असताना विषारी अंश दुधात उतरत असतात. गाजर गवताची वाढ आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने, गाजर गवत निर्मुलनासाठी सामूहिकरीत्या गाव पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत.गाजर गवत निर्मुलनासाठी मेक्सिकन भुंगे फायदेशीर ठरल्याचे दिसून आले आहे. शेतात मेक्सिकन भुंगे सोडताना प्रति हेक्टरी ५०० भुंगे सोडावेत. हे भुंगे सोडताना एका पॉलिथिनच्या पिशवीत प्रक्षेत्रावर आणून सोडावेत. याव्यतिरिक्त १०० लिटर पाण्यात २० किलो जाडे मीठ घालून, त्याची फवारणी गाजर गवतावर करावी.

यावर उपचार म्हणून अतिप्रमाणात गाजर गवत खाऊन विषबाधा झालेल्या जनावरांवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषध उपचार करावेत. जनावरांना लिव्हर टॉनिक द्यावे. बाधित जनावरांना गोठ्यात सावलीत बांधून ठेवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT