Mumbai News: ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मतदार यादीत लाखो चुका असून ही यादी जोपर्यंत दुरुस्त केली जात नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका,’’ अशी भूमिका महाविकास आघाडी (मविआ) आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी मंगळवारी घेतली. .राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मंत्रालयात भेट घेतली. या वेोळी श्री. चोकलिंगम यांच्यासमोर शिष्टमंडळाने उपस्थित केलेले काही मुद्दे हे त्यांच्या अखत्यारित नव्हते. ते मुद्दे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अखत्यारितील आहेत. तर काही मुद्दे दोन्ही अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत..Maharashtra Politics: देशाची, महाराष्ट्राची संस्कृती सत्ताधाऱ्यांनी बिघडवली.निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे, तर मतदार यादीची जबाबदारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत विरोधकांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांवर तोडगा न निघाल्याने सर्व मुद्यांवर एकत्रित चर्चा करण्यासाठी बुधवारी पुन्हा एकदा या शिष्टमंडळाची या दोन्ही अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे..दरम्यान, विरोधक निवडणूक अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेणार होते, मात्र चर्चा अनिर्णित राहिल्याने बैठकीनंतर होणारी पत्रकार परिषदही रद्द करून ती बुधवारी ठेवण्यात आली आहे..ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, उद्धव सेनेचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, मिलिंद नार्वेकर, मनसेचे संदीप देशपांडे, शेकापचे नेते जयंत पाटील, भाकपचे सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी, माकपचे अजित नवले, समाजवादी पार्टीचे रईस शेख यांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांची भेट घेऊन आक्षेप नोंदविले..Indian Politics: विरोधकांपुढे व्यापक आव्हान .‘सर्वोच्च न्यायालयाला आक्षेप कळवा’सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. मतदार यादीबाबत विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला कळवून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करावी, असा मुद्दाही विरोधकांनी या बैठकीत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले..जयंत पाटील यांच्या पत्राची दखल नाहीशरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी श्री. चोकलिंगम यांना शिष्टमंडळासह भेटून पत्र दिले होते. यात मतदार यादीत घोटाळा असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. श्री. पाटील यांच्या या पत्राबाबत आयोगाने कोणतीही कार्यवाही केली नाही. या पत्राबाबत विरोधकांनी चोकलिंगम यांना विचारले असता असे पत्र मिळाले नसल्याचे त्यांनी आधी सांगितले. मात्र विरोधकांनी या पत्राची पोहोच बैठकीत दाखवली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.