Parbhani News: परभणी जिल्ह्यातील खराब धानोरा (ता. पालम) येथे यंदाच्या खरिपातील सोयाबीनच्या पीक कापणी प्रयोगादरम्यान विमा कंपनीच्या वजन काट्यावर केलेले वजन व वजनी मापे निरीक्षक यांनी केलेले वजन यामध्ये १.९७७ किलो एवढा फरक आढळून आल्याचे स्पष्ट झाले. ग्रामस्तरीय पीकविमा समितीच्या सजगतेमुळे हा गैरप्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पालमचे तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी मंगळवारी (ता. १४) पालम (जि. परभणी) पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विमा कंपनीच्या प्रतिनिधीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे..खरब धानोरा येथील गट क्र.४४/२ मध्ये ग्रामपंचायत अधिकारी अच्युत भालेराव यांच्यामार्फत खरीप हंगामातील सोयाबीन पीककापणी प्रयोग घेण्यात आला. या वेळी भारतीय कृषी विमा कंपनी लि.चे (ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.) प्रतिनिधी अनिकेत शेरे (रा. नालंदा नगर, नांदेड) व रत्नदीप भालेराव (रा. पंचशील नगर, परभणी) उपस्थित होते..Soybean Harvesting : सोयाबीन सोंगणीवेळी हातमोजे वापराचे प्रात्यक्षिक.या दरम्यान सुकवणीनंतर सोयाबीन धान्याचे मोजमाप कंपनी प्रतिनिधीमार्फत दिलेल्या वजन काट्यावर घेण्यात आले असता ते ५ किलो (पाच किलो) एवढे भरले. परंतु ग्रामस्तरीय विमा समितीमधील सदस्य भास्कर कऱ्हाळे यांनी वजनाबाबत शंका घेतली. त्यामुळे गावातील किराणा दुकानदार उद्धव कऱ्हाळे यांचा वजन काटा आणून मोजमाप केले असता ते ३ किलो (तीन किलो) भरले..शेतकऱ्यांना पीकविमा मिळू नये यासाठी तांत्रिक फेरबदल केलेला अवैध वजनकाटा वापरू संदिग्ध अथवा चुकीचे वजन मोजमाप केले. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी मागणी श्री. कऱ्हाळे यांनी तालुकास्तरीय विमा समितीकडे केली..Soybean Harvesting : सोयाबीन काढणीला सुरुवात; मजुरीत वाढ.तालुका समितीच्या अध्यक्षा तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे, गटविकास अधिकारी उदय शिसोदे, सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी संतोष यांच्या समक्ष वजन काट्याची शहानिशा (पडताळणी) केली असता वजनात वाढ झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी परभणी येथील वजनी मापे निरीक्षक संजय धुमाळे यांच्या अहवालानुसार ॲग्रीकलचर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.च्या प्रतिनिधिंनी केलेल्या सोयाबीनचे वजन ५.००६ किलो दाखवत आहे, तर वजनी मापे निरीक्षक यांच्या मोजमापनुसार त्याच सोयाबीनचे वजन ३.०२९ किलो असे दाखवत आहे..वजनामध्ये १.९७७ किलो एवढा फरक येत आहे. विमा कंपनीचे प्रतिनिधी पर्यायाने विमा कंपनी सदोष वजन-मापे वापरून पीक उत्पादनात बेकायदा बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्तरीय समितीची दिशाभूल करून सोयाबीन उत्पादनात वाढ घडवून आणत आहेत..ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे तालुका कृषी अधिकारी भालेराव यांनी पालम पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून विमा कंपनीच्या प्रतिनिधीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.