Bordeaux mixture Agrowon
कृषी पूरक

एक टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण कसे तयार कराल ?

पिकांवर पडणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक प्रभावी बुरशीनाशक आहे. १८८२ मध्ये प्राध्यापक मिलारर्डेट यांनी बोर्डो मिश्रणाचा शोध लावला.

Roshani Gole

बोर्डो मिश्रणातील घटक-

यासाठी निळे स्फटीकमय मोरचूद, कळीचा चुना आणि पाणी हे प्रमुख तीन घटक वापरले जातात. एक टक्का तीव्रतेचे शंभर लिटर द्रावण तयार करायचे असल्यास, एक किलो मोरचूद आणि एक किलो कळीचा चुना लागेल.

यासाठी एक किलो मोरचूद रात्रभर ५० लिटर पाण्यामध्ये भिजत घालावा. प्लॉस्टिकच्या दुसऱ्या ड्रममध्ये ५० लिटर पाण्यात एक किलो चुना भिजत ठेवावा. हे दोन्ही द्रावण काठीने हलवून घ्यावे. मोरचूद आणि चुन्याचे द्रावण तिसऱ्या १०० लिटर ड्रममध्ये समप्रमाणात ओतत राहावेत. मिश्रण ओतताना ते काठीने ढवळत राहावे. या तयार झालेल्या मिश्रणाला बोर्डो मिश्रण असे म्हणतात.

बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी –

- वापरलेला कळीचा चुना हा खडक विरहीत असावा.

- बोर्डो मिश्रण हे प्लॉस्टिक ड्रम किंवा प्लॉस्टिक बादलीमध्ये तयार करावे.

- मिसळताना दोन्ही द्रावण थंड राहतील याची काळजी घ्यावी.

- तयार केलेले बोर्डो मिश्रण जास्त काळ ठेऊ नये. ठेवायचे असल्यास कळीचा चुना आणि मोरचूदचे द्रावण मिक्स करू नये.

- बोर्डो मिश्रणाची फवारणी करण्यासाठी ते फवारणी यंत्रामध्ये भरताना गळून मगच भरावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Anudan : शेतकऱ्याने तहसीलदाराच्या गाडीच्या फोडल्या काचा; अतिवृष्टीचं अनुदान न मिळाल्याने शेतकरी संतप्त

Electric Tractors in Agriculture: शेतीत आता आवाज, धूर निघणार नाही, खर्चही कमी, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे काय आहेत फायदे?

Unseasonal Rain : रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा

Bamboo Cultivation : बांबू लागवडीतून रोजगाराची हमी

Crop Management: अवकाळी पावसानं भातशेती संकटात; 'या' उपाययोजना केल्यानं उत्पादनातील घट टाळता येईल

SCROLL FOR NEXT