पीक अवशेषातून अन्नद्रव्यांची उपलब्धता  
कृषी पूरक

पीक अवशेषातून अन्नद्रव्यांची उपलब्धता

डॉ. अजितकुमार देशपांडे

पीक अवशेषांमध्ये नत्राचे १.२५ ते ०.४० टक्के, स्फुरदाचे १.५० ते ०.२० टक्के आणि पालाशचे प्रमाण २.१५ ते ०.४० टक्क्यापर्यंत असते. तसेच यामध्ये पिकांना आवश्‍यक असलेली दुय्यम अन्नद्रव्ये व सूक्ष्मअन्नद्रव्येदेखील उपलब्ध असतात. नत्राचे प्रमाण कडधान्य पिकांमध्ये जास्त तर तृणधान्यामध्ये कमी असते.   

सें द्रिय शेतीमध्ये प्रामुख्याने पिकांची फेरपालट, सेंद्रिय पदार्थांचा वापर, द्विदल वर्गीय पिकांचा पीकपद्धतीत अंतर्भाव, हिरवळीची खते आणि जैविक कीड नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. यातून जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर दिला जातो. पिकाच्या काढणीनंतर शिल्लक राहणाऱ्या पीक अवशेषांमध्ये पिकासाठी आवश्यक सर्व अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय कर्ब भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यातील लिग्नीन, सेल्यूलोज, हेमीसेल्यूलोज, स्टार्च, साखर, प्रोटिन या पदार्थामधून जिवाणूंना ऊर्जा उपलब्ध होते. या ऊर्जेचा वापर करत जिवाणू सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात.

  •    पीक अवशेष जमिनीत गाडल्यानंतर जिवाणूमुळे कुजण्याची क्रिया सुरू होते. या वेळी वेगवेगळी सेंद्रिय आम्ले तयार होतात. या आम्लांमुळे जमिनीत अनुपलब्ध स्वरुपात असलेली अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात आणली जातात. काही सूक्ष्मद्रव्यांचे चिलेशन झाल्यामुळे ते दीर्घकाळ पिकांना उपलब्ध होतात.   
  •    पीक अवशेष जास्तीत जास्त बारीक करून जमिनीत गाडल्यास कुजण्याची क्रिया वेगाने होते. कारण जेवढे बारीक कण होतील तेवढे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते. परिणामी जिवाणूच्या प्रक्रियेस जास्त जागा उपलब्ध होते. यासाठी जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा असणे आवश्‍यक आहे.
  •    जिवाणूंच्या वाढीसाठी ऊर्जा, ओलावा, तापमान (२५ ते ३५ अंश सेल्सिअस), योग्य सामू (६.५ ते ८.५) यांची आवश्‍यकता असते.
  •    कोरडवाहू क्षेत्रात पाऊस कमी पडल्यास पीक अवशेष गाडता येत नाहीत. अशावेळी त्यांचा आच्छादन म्हणून वापर केल्यास जमिनीत ओलावा टिकून राहतो व उत्पादनही वाढते. कालांतराने पाऊस झाल्यानंतर कुजण्याची क्रिया होण्यास सुरुवात होते.
  •    खरीप हंगामात पीक अवशेष जमिनीमध्ये गाडल्यास कुजण्याची क्रिया चांगली होते. परंतु, रब्बी किंवा उन्हाळी हंगामात कुजण्याची क्रिया होण्यासाठी पाणी सोडणे आवश्‍यक असते. 
  •    रासायनिक शेतीतील पीक अवशेष सेंद्रिय शेतीमध्ये वापरता येत नाहीत. आजूबाजूच्या कुरणातील गवत किंवा झाडपाला शेतामध्ये वापरायचा असल्यास, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे रासायनिक प्रदूषण नाही, याची खात्री करून घ्यावी.   
  •    पीक अवशेषांमध्ये नत्र १.२५ ते ०.४० टक्के, स्फुरद १.५० ते ०.२० टक्के आणि पालाशचे प्रमाण २.१५ ते ०.४० टक्क्यांपर्यंत असते. तसेच यामध्ये पिकांना आवश्‍यक असलेली दुय्यम अन्नद्रव्ये व सूक्ष्मअन्नद्रव्ये देखील उपलब्ध असतात. नत्राचे प्रमाण कडधान्य पिकांमध्ये जास्त तर तृणधान्यामध्ये कमी असते. 
  •    भारतामध्ये प्रमुख पिकांपासून किती पीक अवशेष व अवशेषांपासून किती अन्नद्रव्ये उपलब्ध होतात, याचा शोध भारद्वाज व गौर (१९८५) या शास्त्रज्ञांनी घेतला होता.  
  •    प्रमुख पिकांपासून किती पीक अवशेष, सेंद्रिय पदार्थ व नत्र, स्फुरद, पालाश मिळतात, याचा अभ्यास शण्मुगसुंदरम् व अन्य शास्त्रज्ञांनी (१९७५) केला होता. 
  • पीक अवशेष क्षमता 

    अ.  क्र.

    पीक

    पीक खुंट (किलो/हेक्‍टर) अन्नद्रव्यांची उपलब्धता (किलो/हेक्‍टर) 
          सेंद्रिय पदार्थ नत्र स्फुरद पालाश
    १. भात ४,२०० १,७६४ १७.६ २.९ २५.२ 
    २. ज्वारी २,८८९ ४६२ ६.१ २.६ ९.५ 
    3 मका ६६७ ९३ ०.६ ०.२ २.७ 
    ४. रागी ३,१११ ८९९ ४३.५ ३.८ २०.५ 
    ५. नाचणी १,२०० १०८ ११.७ १.२ २.१ 
    ६. भगर ३,२०० ६४० २०.२ ०.६ १६.० 
    ७. बर्नयार्ड मिलेट ८०० १०४ ७.८ २.२ ६.६ 
    ८. प्रोसो मिलेट १२०० १०९ ९.० ०.७ १६.० 
    ९. तीळ ७७८ ५६ ५.५ ०.२ १.३ 
    १०.  चवळी ४४४ ३६ ३.१ ०.३ ३.१ 
    ११.  लुसर्न ३३३ ३६ ०.५ ०.६ १.१

      ः डॉ. अजितकुमार देशपांडे, ९४२३३२५८७९ (माजी सहयोगी अधिष्ठाता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Rain Crop Damage : कसबे सुकेणे गावात ३०० हेक्टर क्षेत्र बाधित

    Onion Rate Crisis : कांदा दरासाठी विंचूरला आंदोलन

    Agriculture Mechanization : शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये आपले सर्वोत्कृष्ट योगदान द्या ः डॉ. नलावडे

    Rice Pest Control: भातावरील गंधी ढेकूण, तपकिरी तुडतुडे आणि लष्करी अळीचे नियंत्रण

    Kolhapur ZP Ward Reservation: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तालुकानिहाय गट आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

    SCROLL FOR NEXT