Mudhol Hound Dogs,
Mudhol Hound Dogs, 
कृषी पूरक

मुधोळ हाऊंड श्वानास राष्ट्रीय मान्यता

डॉ.व्यंकटराव घोरपडे

मुधोळ हाऊंड ही श्वान जात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. हे श्वान शेतातील राखणीसाठी अत्यंत योग्य आहेत.या श्वान जातीला नुकतीच देशातील नोंदणीकृत जात म्हणून मान्यता मिळाली आहे. मुधोळ हाऊंड, हिमाचली हाऊंड त्याचबरोबर राजपालायम,सिपीपराइ,कान्नी या भारतीय श्वानांच्या जाती आहेत. या सर्व जाती देशातील वेगवेगळ्या भागात उपलब्ध आहेत. मुधोळ हाऊंड ही जात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या प्रजातीचे संवर्धन केले. तसेच सैन्यदलात मानाचे स्थान दिले होते. मुधोळचे वतनदार राजे मालोजीराव घोरपडे यांनी या श्वानांच्या पिल्लांची एक जोडी लंडन भेटीत तेथील पाचव्या किंग जॉर्ज यांना भेट दिली होती. त्यावेळी त्याचे नामकरण मुधोळ हाऊंड असे करण्यात आले. एकंदर या मुधोळ हाऊंड या श्वान जातीस चांगला राजाश्रय मिळाला होता. साधारण वीस वर्षांपासून आपल्या देशात विदेशी श्वांनांची संगोपनासाठी मागणी वाढू लागली. परदेशी श्वानांची ठेवण, वागणे आणि एकंदर त्यांची रचना ही त्या त्या त्यासंबंधित देशातील त्यांच्या मूळ हवामानाला अनुसरून असते. आपण याकडे दुर्लक्ष करतो. केवळ मोठेपणासाठी विदेशी श्वानांचा सांभाळ केला जातो. दुसऱ्या बाजूचा विचार करायचा झाल्यास भारतीय श्वान प्रजाती या प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद देतात. आपल्या स्थानिक वातावरणात तयार झाल्यामुळे त्यांची शरीररचना, त्वचा, डोळे, पाय, शेपूट सुद्धा या वातावरणाशी मिळतेजुळते असणारे असते. मुधोळ हाऊंडची वैशिष्टे 

  • मुधोळ हाऊंड श्वान शेतातील राखणीसाठी अत्यंत योग्य आहेत. मात्र शहरी वातावरणात पूर्ण क्षमतेने ही जात राहील, वागेल याची शाश्वती देता येत नाही.
  • वाढते सिंचन क्षेत्र आणि शेतावर जाऊन राहणे आणि शेती करणे यामध्ये वाढ होत आहे.त्यामुळे ही मंडळी निश्चितच या जातीचा वापर शेतावर राखणीसाठी करू शकतात.
  • नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) मध्ये मुधोळ हाऊंड श्वान समाविष्ट होणार आहे. मुधोळ येथील केनाईन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर (सी. आर. आय. सी) येथे पिल्लांची मागणी नोंदवली आहे.
  • शरीराने बळकट व उच्च प्रतीच्या हुंगण्याच्या शक्तीमुळे तसेच त्याची हुशारी आणि आज्ञाधारकपणा यामुळे भारतीय सैन्यदलात, सुरक्षा दलात वापर सुरू झाला आहे.
  • कमी वजन, लांब पाय त्यामुळे इतर प्रजाती पेक्षा हे श्वान वेगाने धावतात. साधारण पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगाने हे श्वान धावतात. तसेच तीन किलोमीटर वरील वस्तूच्या वासाचा मार्ग काढू शकतात. त्यामुळे भारतीय सीमा सुरक्षा दलासह आंध्र प्रदेश, राजस्थान सरकारने आपल्या पोलिस दलात देखील त्यांना समाविष्ट केले आहे.
  • सध्या बिदर येथील पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या  आधिपत्याखाली मुधोळ येथील केनाईन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये या प्रजातीचे प्रजनन केले जाते. इस्टेट मालक, चहाचे मळे वाले, फार्म हाऊस मालक अशी मंडळी जंगली जनावरांच्या पासून संरक्षणासाठी या जातीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत.
  • नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस (एन.बी.ए.जी.आर) या राष्ट्रीय संस्थेने २८ सप्टेंबर, २०२० च्या पत्राद्वारे मुधोळ हाऊंड श्वान जातीला देशातील नोंदणीकृत जात म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या जातीचे अजून महत्त्व अधोरेखित होते.
  • नवयुवकांना भारतीय प्रजातीच्या जोड्या ठेवून पिल्लांची निर्मिती करणे, विक्री करणे हा चांगला व्यवसाय देखील करता येऊ शकतो.
  • संपर्क ः डॉ.व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५ (सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन), सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

    Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

    Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    SCROLL FOR NEXT