Pune News: गावखेड्यांचा गावगाडा चालविणाऱ्या पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदांच्या निवडी सोमवारी (ता.९) नाट्यमय घडामोडींमुळे उत्सुकतेच्या ठरल्या. जुन्नरमध्ये शिवसेनेला (शिंदे गट) ठाकरे गटाच्या एकमेव सदस्याची साथ मिळाल्याने सभापतिपद मिळाले, तर भोर येथे चिठ्ठीद्वारे कल मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला. तर, हवेलीत अपक्षाच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. .जुन्नरमध्ये शिवसेनेकडे (शिंदे गटा) ८, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ६ आणि भाजप-शिवसेनेकडे (ठाकरे गट) प्रत्येकी एक सदस्य होते. यामुळे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापनेचे प्रयत्न केले. आमदार शरद सोनवणे यांनी ठाकरे गटाचे सदस्य अमित ढोले यांना उपसभापतिपद बहाल करून, त्यांना आपलेसे करत कमल शेळकंदे यांच्या सभापतिपदाचा मार्ग सुकर केला..खेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. सभापतिपदी विद्या मोहिते, तर उपसभापतिपदी मंगेश सावंत यांची निवड झाली आहे. आंबेगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कैलासबुवा काळे, तर उपसभापतिपदी ज्योती पारधी यांची बिनविरोध निवड आली. घोडेगाव येथील पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे आणि गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. पंचायत समितीच्या १० पैकी ८ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत होते. बहुमताच्या जोरावर कोणत्याही नाट्यमय घडामोडी न होता सभापती आणि उपसभापतिपदी काळे आणि पारधी यांची बिनविरोध विजयी झाले..Rajya Sabha Elections 2026: राज्यसभेसाठी भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवलेंना उमेदवारी, यादीत दोन नवे चेहरे.भोर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण गटासाठी राखीव होते. निवडणुकीत ८ पैकी चार जागा राष्ट्रवादी आणि ४ जागा भाजप आणि इतर पक्षांना मिळाल्या. समसमान जागा मिळाल्याने या निवडणुकीत उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनीषा कंक, तर भाजपच्या वतीने गीता आंबवले यांनी अर्ज दाखल केले होते. या वेळी चिठ्ठी काढण्यात आली. चिठ्ठीमध्ये मनीषा कंक यांचे नाव निघाल्याने त्या विजयी झाल्या. तर उपसभापतिपदी विशाल कोंडे यांची निवड झाली..मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या मंदा शेळके, तर शरद पवार गटाचे दगडू करंजवणे उपसभापती झाले. भोर सह मुळशीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्याने भाजपचे नेते माजी आमदार संग्राम थोपटे यांना धक्का मानला जात आहे. मुळशीमधील ६ पैकी ३ जागांवर अजित पवार गट, तर दोन जागांवर शरद पवार गट, तर एका जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता राष्ट्रवादीकडेच कायम ठेवली आहे.हवेलीमध्ये अपक्ष उमदेवाराच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज काकडे, तर उपसभापतिपदी अपक्ष राहिलेल्या विद्या गायकवाड विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी काकडे आणि गायकवाड यांचे एकमेव अर्ज आल्याने दोन्ही पदे बिनविरोध झाली..बारामती दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोधबारामतीमध्ये पंचायत समितीच्या सभापतिपदी किरण तावरे यांची, तर उपसभापतिपदी शुभांगी आगवणे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीत सोमवारी (ता.९) झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. सभापतिपदासाठी तावरे, तर उपसभापतिपदासाठी आगवणे या दोनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड घोषित करण्यात आली..Election Expenses: निवडणूक खर्च देण्यासाठी उमेदवारांना १० मार्चची मुदत.दौंडमध्ये भाजपची बाजीदौंडमध्ये भाजपने बाजी मारली असून, सभापतिपदी सुखदेव चोरमले व उपसभापतिपदी अमृता गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची सभापती व उपसभापतिपदावर निवड झाली आहे. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे यांनी काम पाहिले..इंदापूर पंचायत समिती सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन मधुकर लोंढे, तर उपसभापतिपदी जयकुमार गोपाळ कारंडे बिनविरोध विजयी झाले आहेत. पंचायत समिती सभागृहात पीठासन अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पंचायत समिती सदस्यांच्या विशेष बैठकीत निर्धारित वेळेत सभापती पदासाठी लासुर्णे गणातून विजयी झालेले हर्षवर्धन मधुकर लोंढे यांनी उपसभापती पदासाठी शेळगाव गणातून विजयी झालेले जयकुमार गोपाळ कारंडे यांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नायब तहसीलदार विजय घुगे यांनी काम पाहिले.राजगड (वेल्हा) पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या सुवर्णा राऊत, तर उपसभापतिपदी संदीप खुटवड यांची निवड झाली. तर मावळच्या सभापतिपदी सुनीता येवले आणि उपसभापतिपदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड झाली..पुरंदरला राष्ट्रवादी- शिवसेनेत युतीपुरंदर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत सोमवारी नाट्यमय राजकीय घडामोडी घडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अनपेक्षित युती झाली. या युतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे यांची सभापतिपदी तर शिवसेनेचे प्रवीण जगताप यांची उपसभापतिपदी निवड जाहीर करण्यात आली. पंचायत समितीच्या आठ जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचे दोन आणि भाजपचे दोन सदस्य निवडून आले होते. सभापती निवडीसाठी आवश्यक असलेले पाच सदस्य कोणत्याही पक्षाकडे नसल्याने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंगमेकरची भूमिका होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत की शिवसेनेसोबत युती करणार याबाबत रविवारी सायंकाळपर्यंत अनिश्चितता होती. दरम्यान, सोमवारी सकाळी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना (शिंदे गट) सोबत युती करत उपसभापतिपद शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला. राजकीयदृष्ट्या भाजपसोबत युती होण्याची शक्यता अधिक मानली जात होती. परंतु राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर आणि विद्यमान आमदार विजय शिवतरे यांच्यासोबत झालेल्या समन्वयातून शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्यात आला..प्रमुख निवडी१३ पैकी १० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्वदोन्ही शिवसेना, भाजपला प्रत्येकी एका जागाजुन्नरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र, हवेलीत अपक्षाच्या साथीने राष्ट्रवादीची सत्ताभोरमध्ये चिठ्ठीचा कल राष्ट्रवादीकडे, पुरंदरमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रखेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजीपंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच दौंडमध्ये भाजपची बाजी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.