cattle management 
कृषी पूरक

जनावरांना द्या पुरेसे खनिज मिश्रण

जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा केल्याने त्यांची चांगली वाढ होते. भूक वाढते, पचन क्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दूध उत्पादनात वाढ होते. अखाद्य वस्तू चाटणे, चघळणे यासारख्या वाईट सवयी बंद होतात.

डॉ. सी.व्ही. धांडोरे

जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा केल्याने त्यांची चांगली वाढ होते. भूक वाढते, पचन क्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दूध उत्पादनात वाढ होते. अखाद्य वस्तू चाटणे, चघळणे यासारख्या वाईट सवयी बंद होतात.

खाद्य, चारा, खनिजांची कमतरता तसेच अधिक दूध उत्पादन यामुळे दुधाळ जनावरांमध्ये खनिजांची कमतरता भासते. खनिजांच्या कमतरतेचा जनावरांचे आरोग्य, प्रजनन तसेच उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. शरीराची आवश्यक खनिजांची पूर्तता होण्यासाठी जनावरांना नियमितपणे खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे. खनिज मिश्रणाची शारीरिक गरज, शरीरातून बाहेर पडणाऱ्या खनिज द्रव्यांची कमतरता, रक्तातील लोह, हिमोग्लोबीन, हाडांमधील कॅल्शिअम, स्फुरद, खनिज द्रव्यांची झीज भरून काढण्यासाठी, स्नायू निरोगी ठेवण्यासाठी, पाचक रसाचे उत्पादन करण्यासाठी जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणाचा पुरवठा करणे आवश्‍यक आहे. शरीरातील कोणतीही क्रिया खनिज मिश्रणाच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जनावरांच्या खाद्यात प्रथिने ऊर्जेचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात होत असते. परंतु खनिज मिश्रणाची कमतरता कायमस्वरूपी दिसून येते. जनावरांच्या शरीरात खनिज मिश्रणांचे संतुलन महत्त्वाचे आहे.

खनिज मिश्रणाची आवश्यकता

  • जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणे उत्पादन केली जात नाहीत.
  • पारंपारिक खाद्यपदार्थांमध्ये खनिज मिश्रणाचे प्रमाण अत्यंत कमी असते.
  • शारीरिक अवस्थेनुसार खनिज मिश्रणाची गरज सर्वसाधारण खाद्यामधून पूर्ण होत नाही.
  • जनावरांना खनिज मिश्रणाचा पुरवठा
  • आहारातून खनिज मिश्रण द्यावे.
  • वासराच्या गोठ्यामध्ये चाटण विटा टांगून ठेवाव्यात.
  • पाण्यातून व खुराकातून मीठ द्यावे.
  • खनिज मिश्रणाचे फायदे

  • दूध उत्पादनात वाढ.
  • माजाचे चक्र सुरळीत सुरू राहते, तसेच गर्भधारणेचे प्रमाण वाढते.
  • वाढ झपाट्याने होते. भूक वाढते. पचन क्रिया सुधारते.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आरोग्य उत्तम राहते.
  • अखाद्य वस्तू चाटणे, चघळणे यासारख्या वाईट सवयी बंद होतात.
  • नर-मादी वासरांमध्ये प्रजनन शक्ती वाढते.
  • दोन वेतातील अंतर कमी होते.
  • खनिज कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम

  • रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
  • हाडांमध्ये ठिसूळपणा येतो.
  • तात्पुरता वांझपणा येतो.
  • भूक मंदावते,वाढ खुंटते, अशक्त होतात.
  • सुई, तार, खिळा इत्यादी सारख्या अखाद्य वस्तू खाण्याने जनावरांचा मृत्यू ओढवू शकतो.
  • आहारातील खनिज मिश्रणांचे प्रमाण

  • जनावराच्या वाढीच्या अवस्थेनुसार खनिज मिश्रण देण्यात यावीत.
  •  दूध देणाऱ्या गाई, म्हशींना प्रतिदिन १०० ते २०० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे.
  • भाकड गाई, म्हशींना प्रतिदिन ५० ग्रॅम खनिज मिश्रणे द्यावीत.
  • लहान वासरे, कालवडींना प्रतिदिन २० ते २५ ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे.
  • खनिज मिश्रण पशुखाद्यात मिसळून द्यावे. त्यासोबत १५ ते २० ग्रॅम मीठ टाकावे.
  • खनिज मिश्रण हे औषध नसून जनावरांच्या खाद्यातील आवश्यक घटक आहे.
  • महत्त्वाची खनिज द्रव्ये

  • कॅल्शिअम, फॉस्फरस, सल्फर, कॉपर, झिंक, क्रोमियम, कोबाल्ट, मॅग्नेशिअम, आयोडीन इत्यादी महत्त्वाची खनिज द्रव्ये आहेत.
  • दात व हाडे मजबूत होण्यासाठी तसेच मांसपेशींचे प्रसरण आणि आंकूचन होण्यासाठी कॅल्शिअम अत्यंत उपयोगी आहे.
  • दूध उत्पादनासाठी आवश्यक ऊर्जेचा शरीरामध्ये वापर होण्यासाठी फॉस्फरस गरजेचे आहे.
  • सल्फर शरीरात प्रथिने आणि बी कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी तसेच कर्बोदकांचा उपयोग होण्यासाठी उपयोगी पडते.
  • हिमोग्लोबीन निर्मिती, जनावरांची त्वचा, केसाचा रंग, विकर बनवण्यासाठी तसेच सामान्य प्रजनन क्रिया राखण्यासाठी कॉपर चा उपयोग होतो.
  •  शरीरात कर्बोदकांच्या वापरासाठी, सामान्य प्रजनन क्रिया चालू राहण्यासाठी मॅग्नेशिअम उपयुक्त आहे.
  • क्रोमियम शरीरामध्ये कर्बोदके, प्रथिने, मेद यांच्या पचनास मदत करते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
  • -  डॉ. सी.व्ही. धांडोरे, ९३७३५४८४९४ (विषय विशेषज्ञ, पशुवैद्यकशास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, कणेरी मठ जि.कोल्हापूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

    Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

    Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

    Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

    Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

    SCROLL FOR NEXT