Adulteration In Eggs 
कृषी पूरक

अंड्यात खरंच भेसळ असते का?

अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच होय. अंड्याच्या आत पांढऱ्या रंगाचा पापुद्रा म्हणजे एक पातळ लेयर असतो, ज्याला आपण shell membrane असं म्हणतो.

टीम अॅग्रोवन

अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच होय. अंड्याच्या आत पांढऱ्या रंगाचा पापुद्रा म्हणजे एक पातळ लेयर असतो, ज्याला आपण shell membrane असं म्हणतो. त्याच्या आत पांढरा बलक आणि सर्वात मध्यभागी पिवळा बलक असतो. अंड्याच्या कवचामध्ये अतिसूक्ष्म अशी अनेक छिद्रे असतात. या छिद्राद्वारे हवेची देवाणघेवाण होत असते. जसे अंडे शिळे होत जाते तसतशी बाहेरील हवा अंड्यात शिरते व अंड्यातील आद्रॆता बाहेर टाकली जाते. कोरडी हवा आत गेल्याने आणि अंड्यातील ओलेपणा सतत बाहेर पडल्यामुळे आतील पदार्थ काहीसे शुष्क होत जातात. परिणामी अंड्याचे वजन कमी होऊन असे अंडे पाण्यात टाकल्याने ते पाण्यावर तरंगते. अशी शिळी अंडी फोडल्यावर वर उल्लेख केल्याप्रमाणे  कवचाच्या आतील पृष्ठभागातील आवरण हे शुष्क व जाडसर होऊन प्लाॅस्टिक सारख वाटत.

अंड्यातील पांढऱ्या बलकामध्ये आतील पिवळा बलक मधोमध राहावा, यासाठी अंड्याच्या दोन्ही बाजूनी पांढऱ्या रंगाचे तंतुमय बह्ग दिसतात. ज्याला इंग्लिश मध्ये चलाझा असं म्हंटल जातं. अंड्यातील ओलावा बाहेर गेल्याने ते तंतू जाड दोऱ्यासारखे दिसू लागतात. बरेचदा अंडी फ्रिजमधून काढून लगेचच वापरली असताही असा प्रकार दिसण्यात येतो. आणि इथेच आपला गैरसमज होतो. याचाच अर्थ आपल्याकडे प्लाॅस्टिक ची अंडी बनली जात नाही आणि विकलीही जात नाहीत. म्हणजेच अंड हे भेसळमुक्त आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दरात सुधारणा; सोयाबीन आवक सुधारली, कारली दरात चढ उतार, मेथीचे दर तेजीतच तर सिताफळाचे दर टिकून

Sugarcane Protest: 'स्वाभिमानी'नं ऊस तोडी बंद पाडल्या, निपाणी- मुरगूड रस्त्यावर कर्नाटकातून येणारी वाहतूक रोखली

Chick pea Farming: हरभरा उत्पादन वाढीसाठी सप्तसूत्रे

Nafed Procurement: सोयाबीन, उडीद, मुगाची १५ पासून हमीभावाने खरेदी

Paddy Harvest: दोडामार्ग, सावंतवाडीला झोडपले; भात कापणी रखडलेलीच

SCROLL FOR NEXT