Kolhapur News: ‘आंदोलन अंकुश’च्या माध्यमातून ‘उस रिकव्हरी प्रयोगशाळा’ पुढील हंगामापासून सुरू होणार आहे. ऊस वजन काट्याच्या यशस्वी प्रयोगानंतर ऊस रिकव्हरी प्रयोगशाळा लोकवर्गणीतून साकारण्यात येणार आहे. .यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उसाची मोफत रिकव्हरी समजणार आहे. यासाठी अंदाजे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असून २६ जानेवारी रोजी लोकवर्गणीचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती, ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली..Agri Research Lab Controversy: प्रयोगशाळेवरून सावळा गोंधळ.श्री. चुडमुंगे म्हणाले, ‘‘शेतकरी आणि दानशुरांच्या आर्थिक मदतीतून शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर ऊस वजन काट्याची निर्मिती करण्यात आली आहे. याच ठिकाणी शेतकऱ्यांना विनाशुल्क आपल्या उसाची रिकव्हरीही समजणार आहे. ‘आंदोलन अंकुश’च्या माध्यमातून सातत्याने उसाला योग्य भाव मिळण्यासाठी लढा दिला आहे. .Sugarcane Recovery : परळी वैजनाथमध्ये उसाचा एकरी उतारा घटला .शेतकऱ्यांच्या विश्वासावर वजन काट्याचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता मोफत रिकव्हरी काढून दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे दाम मिळताना कुणीही त्यांची फसवणूक करणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी उसाची कायदेशीर किंमत ही साखर कारखान्याच्या रिकव्हरीवर ठरवली जाते. ती रिकव्हरी कारखाना सांगेल ती शेतकऱ्यांना मान्य करून त्या रिकव्हरीनुसार निघणारी एफआरपी घेऊन गप्प बसावे लागते.’’.कमी रिकव्हरी असणाऱ्या व्हरायटी कारखाने अगदी नगण्य प्रमाणात घेत असताना १ टक्का रिकव्हरीचा फरक हा संशय निर्माण करणारा नक्कीच आहे आणि आजच्या दराने १ रिकव्हरीचे ३५० रुपये होतात. त्यामुळे येणाऱ्या काळात पारदर्शक रिकव्हरीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे जादा कसे मिळतील, यासाठी हा प्रयोग केला जाणार असल्याचे श्री. चुडमुंगे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.