Ahilyanagar News: श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. खोकर येथे बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडला, तर भोकर परिसरात दुचाकीस्वाराला बिबट्याने धडक दिल्याने दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे..श्रीरामपूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या त्रासाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी खोकर शिवारातील फकीरमळा येथे अल्ताफ शेख यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला चढवत शेळीचा फडशा पाडला. हा प्रकार शेख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने अर्धवट खाल्लेली शेळी सोडून बिबट्याने पलायन केले. .Leopard roar: बोरी साई इजाऱ्यात बिबट्याचा धुमाकूळ .परंतु आपली शिकार पुन्हा नेण्यासाठी रात्री वारंवार घरासमोर घिरट्या घालून बिबट्याने शेख परिवाराला हैराण केले. तर मंगळवारी (ता. ३०) भोकर येथील वडजाई परिसरात रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास राजू लोखंडे हे दुचाकीवरून चालले असताना अचानक बिबट्या आडवा येऊन गाडीला धडकला. या धडकेत लोखंडे खाली पडले. दुचाकीस्वाराचे दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला..Leopard Fights: शेतात बिबट्यांच्या झुंजीचा थरार.दरम्यान, या घटनांची माहिती बाजार समितीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य राजू चक्रणारायण यांनी आमदार हेमंत ओगले यांना दूरध्वनीद्वारे कळविल्यानंतर आमदार ओगले यांनी वन अधिकाऱ्यांना पिंजरा लावावा. तसेच नुकसानग्रस्तांना तत्काळ पंचनामे करून मदत देण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, अकोले शहरातील अगस्ती मंगल कार्यालयाजवळील धुमाळवाडी रस्ता परिसरात एक नव्हे, तर तब्बल चार बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. Forest.त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. अकोले, संगमनेर, जुन्नर तालुक्यांत बिबट्यांची संख्या व हल्ले वाढत असून ही बाब चिंताजनक आहे. धुमाळवाडी रस्ता परिसरात एक नव्हे, तर तब्बल चार बिबटे एका बंगल्यांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले आहेत. सायंकाळी सहानंतर हे बिबटे उसाच्या फडातून थेट मनुष्यवस्तीत येऊन कुत्री, जनावरे यांचा फडशा पाडत आहेत. अंधारात बिबटे बाहेर पडत असून नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. या बिबट्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.