Latur/Dharashiv News: मागील पंधरा दिवसांपासून सोयाबीनचे बाजारातील भाव पाच हजार रुपये क्विंटलच्या पुढे सरकले असून, भावात चढ-उतार होत असली तरी ते पाच हजार रुपये क्विंटलपेक्षा कमी होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या भाववाढीच्या आशा लागल्या आहेत. .यातूनच हमीभावाने सोयाबीन विक्रीची धडपड शेतकऱ्यांनी थांबवली असून लातूर जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांकडून २१ हजार हजार शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येण्याचे मेसेज पाठवूनही आतापर्यंत नऊ हजार ९०० शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे. धाराशिव जिल्ह्यातही मेसेज पाठवलेल्या साडेतेरा हजारपैकी सहा हजार नऊशे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे. या स्थितीत शेतकरी उत्पादक कंपन्यांकडील केंद्रावर सोयाबीनची जोरदार खरेदी सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे..यंदा अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने १५ नोव्हेंबरपासूनच हमीभावाने सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात केली. प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झाली तरी बाजारात सोयाबीनचे भाव साडेपाच हजाराच्या पुढे सरकत नव्हते. यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिल्याने रब्बीच्या पेरण्यांना उशीर झाला. .त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी तरी मळणी केली नव्हती. पेरण्या उरकल्यानंतर शेतकऱ्यांनी भावाचा अंदाज घेऊन मळणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार बाजारात भाववाढीची वाट पाहून शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीनच्या विक्रीला सुरुवात केली. केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली असतानाच बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली..MSP Tur Sale : हमीभाव आणि बाजारभाव सारखेच असल्याने तूर विक्रीला निरुत्साह.त्यानंतर पंधरा दिवसांपासून सोयाबीनचे भाव वाढू लागले. दहा दिवसांत हे भाव पाच हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले. बाजारभावाने पाच हजार शंभर रुपयांचा पल्ला गाठल्यानंतर हमीभाव केंद्रावरील गर्दी कमी होऊ लागली..Agricultural Sales Centre: खामगाव येथे सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्र सुरू.शेतकऱ्यांना बाजारात आणखी भाव वाढण्याची आशा लागली असून, खरेदी केंद्रावर सोयाबीनची विक्री करावी की आणखी भाव वाढण्याची आशा ठेऊन बाजारात विक्री करावी, या संभ्रमात शेतकरी आहेत..यातूनच शेतकऱ्यांनी वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली असून येत्या काळात भाववाढ न झाल्यास खरेदी केंद्राचा पर्याय सर्वांनी ठेवला आहे. नाफेडच्या केंद्रावरील गर्दी कमी झाली तरी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडील केंद्रावर मात्र सोयाबीनची जोरदार खरेदी सुरू आहे. शेतकरी कंपन्यांची लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ९७ केंद्र असून आतापर्यंत या केंद्रावर २५ हजार ८३९ शेतकऱ्यांनी सुमारे पाच लाख ९५ हजार ७१२ क्विंटलची खरेदी केली आहे. तर नाफेडची लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील ३३ केंद्रांवरील आतापर्यंतची खरेदी साडेतीन लाख क्विंटल आहे. यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रावरील सोयाबीनच्या विक्रीचे सर्वांनाच कोडे पडले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.