Upward Fixation of Patella : जनावरांना शल्यचिकीत्सेसंबंधी अनेक आजार होतात. पशुपालक अशा आजारांवर किंवा व्याधीवर उपचार न करता अशी जानवरे विकून टाकतात. मात्र अशा व्याधींवर परिणामकारक उपाययोजनाही आहेत.
जनावरांतील शल्यचिकीत्सक व्याधीमध्ये रिंगणी ही एक महत्वाची व्याधी आहे. रिंगणी हे स्थानिक भाषेतील नाव आहे.
याला शास्त्रीय भाषेत अपवर्ड फिक्सेशन ऑफ पटेला (Upward Fixation of Patella ) किंवा स्ट्रींग हॉल्ट असे म्हणतात. या व्याधीमध्ये जनावराच्या सांध्याची हालचाल मागच्या पायाच्या आतील बाजूतील पटेला अस्थी ताठर झाल्यामुळे जनावराला हालचाल करताना त्रास होतो, त्यामुळे जानावर लंगडत चालते. ही व्याधी हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते.
रिंगणीसाठी पटेला नावाची अस्थी कारणीभूत असते. जनावरात तीन प्रकारच्या पटेला असतात त्यातील मेडिअल पटेला ताठर झाल्यास रिंगणी होते.
पटेला अस्थी ही सीसमॉईड जातीची अस्थी असून ती लहान वासरांमध्ये आकाराने खूप लहान असते व वयानुसार ती हळूहळू वाढत जाते आणि विशिष्ट आकार प्राप्त केल्यानंतर त्याची वाढ थांबते.
यामध्ये सांध्याची हालचाल (मागच्या पायाच्या आतील बाजूस) पटेला अस्थी ताठर झाल्यामुळे जनावराला हालचाल करताना त्रास होतो, त्यामुळे जानावर लंगडत चालते.
रिंगणी व्याधी कशी ओळखायची?
रिंगणीमुळे मागचा एक किंवा दोन्ही पाय बाधीत होतात.
मागच्या पायाची सांध्याची हालचाल व्यवस्थित होत नाही.
जनावर विश्रांतीनंतर विशेषतः सकाळी लंगडते, पण काही अंतर चालल्यानंतर चाल ही व्यवस्थित होते.
पाय ताठर झाल्यामुळे कधी कधी जनावरांचे खुर जमिनीवर घासतात व त्यामुळे काही जनावरात रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो.
बाधित जनावरे जमिनीवर पाय घासतात.
जनावरे पायांची हालचाल झटके मारत करतात.
अशा जनावरांत चारा खाणे, पाणी पिणे व्यवस्थित असते.
रिंगणीवर उपचार काय आहेत?
अशा जनावरांची वेळीच पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि त्यांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करावी.
अगदी काही वेळातच ही शस्त्रक्रिया होते आणि त्यानंतर जनावर व्यवस्थित चालू शकते आणि त्याला सांध्याची हालचाल करता येते. या शस्त्रक्रियेमध्ये मागच्या पायाच्या आतील बाजूस भूल दिली जाते आणि मेडिअल पटेला अस्थी तोडली जाते.
शस्त्रक्रियेमुळे दुधाळ किंवा गाभण जनावर व काम करणाऱ्या बैलांत कोणताही विपरित परिणाम होत नाही. शस्त्रक्रियेनंतर जनावरास लगेच चालवले जाते.
स्त्रोत - महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.