

दूध उत्पादनाचा (milk production) जवळचा संबंध जनावरांच्या आरोग्याशी निगडीत असतो. जनावराला कितीही चांगल्या प्रतीचा चारा आणि खुराक दिले तरी, जनावर निरोगी नसल्यास दूध उत्पादनात सातत्य आणि वाढ दिसून येणार नाही. दूध उत्पादनात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी बदलणाऱ्या ऋतुत जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
प्रौढ जनावरांना श्वसन रोगाची बाधा झाल्यास दूध उत्पादनात घट दिसून येते. श्वसन संस्थेच्या आजारांमध्ये निवडक औषधी वनस्पतींचा वापर करून उपचार करू शकतो. यात प्रामुख्याने सर्दी आणि खोकला यांचा समावेश होतो. वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारावर योग्य उपचार केल्यास, किरकोळ वाटणारा हा आजार गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. ही लक्षणे वाढत जाऊन, जनावरांना न्युमोनियासारखा आजार होऊ शकतो.
श्वसन संस्थेच्या आजारावर अडुळसा या वनस्पतीची मुळे, पाने, फुले आणि फळे यांचा औषध म्हणून वापर केला जातो. याचा उपयोग कफ पातळ करण्यासाठी, खोकल्याचे प्रमाण कमी करण्यासाठी केला जातो. या वनस्पतीचा प्रत्यक्ष उपयोग जनावरांमधील आजारात करता येतो. या वनस्पतीची पाने व मूळ औषधीमध्ये वापरावे.
तुळस - यासोबतच श्वसनसंस्थेच्या आजारात तुळशीची पाने किंवा बी वापरले जातात. तुळशीचा वापर कफज्वरमध्ये केला जातो. तुळशीमुळे कफ पातळ होऊन आजार कमी होण्यास मदत होते.
कंटकारी- श्वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत गुणकारी अशी ही वनस्पती आहे. या वनस्पतीस रिंगणी किंवा भुईरिंगणी असे म्हटले जाते. या वनस्पतीचे सर्व भाग म्हणजे मूळ, खोड, पान, फळ औषधीमध्ये वापरले जातात.
काळी मिरी - या वनस्पतीचे फळ म्हणजेच मिरे. मिऱ्याचा वापर आपण पचनसंस्थेच्या आजारात करतो. यांचा उपयोग श्वसनाच्या आजारातही होतो.
अद्रक - अद्रक हे पाचक आणि कंठाला हितकारक असते. अद्र्कचा वापर खोकला, कफवर फायदेशीर ठरते. आल्याचा किंवा सुंठाचा वापर श्वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत गुणकारक ठरतो. सुंठाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ओला अद्रक वापरल्यास अधिक प्रभावी ठरते.
कासणी किंवा कासविंदा – ही वनस्पती यकृत उत्तेजक म्हणून देखील वापरली जाते. वनस्पतीचा वापर देखील श्वसनसंस्थेच्या आजारात उपयुक्त ठरतो. या वनस्पतीचे बी औषधामध्ये वापरले जाते.
सर्दी, खोकला यांसारख्या जनावरांच्या आजारावर उपचार करताना एका भांड्यात पाणी गरम करून घ्यावे. त्यात पाच ते दहा थेंब निलगिरी तेल घ्यावे. या तेलात तीन ते पाच ग्रॅम कापूर आणि तीन ते पाच ग्रॅम पुदिना टाकावा. या मिश्रणाची वाफ आजारी जनावरास द्यावी. असे केल्याने जनावराला झालेली सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. वाफ देत असताना त्या पाण्यात जनावरे तोंड घालणार नाहीत याची काळजी घ्यावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.