गोड दुधातही असू शकते भेसळीची शक्यता ? 

दुधाला आपण पूर्णान्न म्हणतो. दूध मानवी आरोग्यासाठी फायद्याचे असते. भेसळयुक्त दुधाचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतात. दुधामध्ये केल्या जाणारी सर्व प्रकारची भेसळ फक्त रंगावरून, वासावरून ओळखता येत नाहीत. त्यासाठी विशेष चाचण्या कराव्या लागतात.
milk adulteration
milk adulteration
Published on
Updated on

दुधाला आपण पूर्णान्न म्हणतो. दूध मानवी आरोग्यासाठी फायद्याचे असते. भेसळयुक्त दुधाचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतात. दुधामध्ये केल्या जाणारी सर्व प्रकारची भेसळ (adulteration) फक्त रंगावरून, वासावरून ओळखता येत नाहीत. त्यासाठी विशेष चाचण्या कराव्या लागतात.  

हेही पाहा-  दुधातील भेसळ ओळखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात ?

बरेचसे पशुपालक धार (milking) काढल्यानंतर दूध, दूध डेअरीला (dairy) देताना, दुधाचे एकूण प्रमाण वाढावे, म्हणून दुधात पाण्याची भेसळ करतात. दुधात पाण्याची भेसळ केल्यानंतर दुधातील टोटल सॉलिडचे (total solid) प्रमाण कमी होते. मग हे प्रमाण तेवढेच ठेवण्यासाठी दुधात साखरेची (suagr) भेसळ केली जाते.

टाकली जाणारी साखर जास्त प्रमाणात पडल्यास टोटल सॉलिडचे प्रमाण वाढते. याशिवाय साखर टाकल्यामुळे दुधाला गोड चव येते, त्यामुळे पिताना ते सहज लक्षात येते. अल्प प्रमाणात केली जाणारी साखरेची भेसळ ओळखण्यासाठी रिसॉरसिनील (Resorcinol)  चाचणी केली जाते.

हेही पाहा- दुधातील भेसळ रोखण्यासाठी दुसऱ्या श्वेत क्रांतीची गरज -   यात १० मि.लि. दूध नमुना परीक्षा नळीत घेतले जाते. -   या दुधात ५ मिली संपृक्त हायड्रोक्लोरिक आम्ल (hydrochloric acid) टाकले जाते. -  ०.१ ग्रॅम रिसॉरसिनील पावडर मिसळून चांगले हलवून नळी गरम पाण्यात ठेवली जाते. -  दुधाचा रंग बदलून जर तो तांबडा झाला तर दुधात साखरेची भेसळ आहे, असे समजावे. -    जर दुधाला तांबडा रंग आला तर दुधात साखर आहे असे समजावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com