Lumpy Vaccination Agrowon
कृषी पूरक

Lumpy Vaccination : सिंधुदुर्गमध्ये ६४ टक्के जनावरांचे लसीकरण

सिंधुदुर्ग जिल्ह्याला आतापर्यंत ८५ हजार लम्पी स्कीन प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून त्यातून ५४ हजार ७०० जनांवराचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्ह्याला आतापर्यंत ८५ हजार लम्पी स्कीन (Lumpy Skin) प्रतिबंधक लस (Lumpy Vaccination) उपलब्ध झाली असून त्यातून ५४ हजार ७०० जनांवराचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्राप्त लसींमधून ६४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख ५ हजार ५०८ गायवर्गीय जनावरे आहेत. या सर्व जनावरांना लसीकरण करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून पशुसंर्वधन विभागामार्फत सुरू आहे. पशुसंवर्धन विभागातील ९१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे लसीकरणाचे मोठे आव्हान पशुसंवर्धन विभागासमोर होते;

मात्र पशुसंवर्धन विभागाने ग्रामपंचायत, डेअरीचे कर्मचारी आणि विविध संस्थांचे सहकार्य घेत लसीकरणाला सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ३५ हजार आणि दुसऱ्या टप्प्यात ५० हजार अशा एकूण ८५ हजार लस प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या लसींमधून आतापर्यंत जिल्ह्यातील ५४ हजार ७०० जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ६४ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

कोट ः जिल्ह्यातील ५४ हजार ७०० जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांअभावी लसीकरणाला विलंब होत होता, परंतु आता शासन निर्णयाप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने २२ कर्मचारी रूजू होणार आहेत. यापूर्वीच १० कर्मचारी रूजू झाले आहेत. त्यामुळे लसीकरणाला आणखी गती प्राप्त होणार आहे.

- डॉ. विद्यानंद देसाई, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT