Poultry Farming
Poultry Farming  Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Farming : बचत गटाच्या महिला करणार कुक्कुटपालन

Team Agrowon

Nagpur News : बचत गटाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध केले. त्यामुळेच पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र नागलवाडी वनपरिक्षेत्रातील चार गावांतील बचत गटातील महिलांना कुक्कुटपालनांचे प्रशिक्षण देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.

या प्रशिक्षणात पक्षांचे संगोपन कसे करायचे, आजार कसे ओळखायचे उपचार कसे करायचे, खाद्य कोणते व किती प्रमाणात द्यायचे, पक्षी किती दिवसांनी विकायचे, पक्ष्यांच्या कोणत्या जाती आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार चांगल्या आहेत अशी सविस्तर माहिती महिलांना देण्यात आली. या व्यवसायातून महिला बचत गटाला आर्थिक स्रोत उपलब्ध झाला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील घाटकूकडा, सावंगी, धावलापूर, नरहर येथील बचत गटातील महिला या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षण कुक्कुटपालन शास्त्र विभाग नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात झाले.

शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा उत्तम व्यवसाय आहे. या प्रशिक्षणाचा फायदा अनेक गावांतील महिलांना झाला. कुक्कुटपालन लाभार्थ्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून उपजीविकेसाठी प्रत्येकी एक लोखंडी शेड, दोन खाद्य भांडे, दोन पाणी भांडे, ब्रूडर कॅप, लाइट बोर्ड, लाइट, चुना बॅग, कोंडा बॅग, एक क्विंटल पशू खाद्य व ५० पक्षी देण्यात आले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी लाभार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी विभागीय वनाधिकारी सोनल कामडी, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. पी. सोमकुवर, प्रशिक्षण समन्वयक डॉ. मुकुंद कदम, डॉ. दर्शना भैसारे, उपजीविका तज्ज्ञ दिनेश मात्रे उपस्थित होते. दरम्यान, सोनल कामडी यांनी लाभार्थ्यांसोबत संवाद साधला व मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

Aquatic Ecosystem : कांदळवने : एक महत्त्वाची जलीय परिसंस्था

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

SCROLL FOR NEXT