Milk Replacer Agrowon
काळजी पशुधनाची

Milk Replacer: मिल्क रिप्लेसर म्हणजे काय?

वासरांचे कमी खर्चात कमी दूध पाजून चांगल्याप्रकारे संगोपन करण्यासाठी वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसरचा वापर करावा.

Team Agrowon

घरच्या गोठ्यातील वासरांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष करून आणि प्रत्येक वेळी बाजारातून गाई, म्हशी खरेदी करून दुग्ध व्यवसाय किफायतशीर होत नाही. दुग्धव्यवसाय किफायतशिर करण्यासाठी  गोठ्यातच वासरांचे योग्य संगोपन (Calf Rearing) करणे आवश्यक आहे. मात्र जन्मलेल्या वासरांना ३ ते ५ महिन्यांपर्यंत दूध पाजून संगोपन करण्यामुळे पशुपालकास आर्थिक बोजा सहन करावा लागतो.

वासरू जन्मल्यानंतर १५ दिवस ते एक महिनाभरात गवत, शेवरी, कडबा, सोयाबीन भुसकट, धान्ये चघळू लागतात. हळूहळू असा चारा खाण्याचे प्रमाण वाढत जाते. त्या वेळी पशुपालक वासरांचे पोट भरण्यासाठी चारा खाऊ घालतात.

दूध गरजेपेक्षा कमी प्रमाणात पाजतात. अशा आहारातून वासरांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषणमूल्याची गरज पूर्ण होत नाही, अशी वासरे अशक्त राहतात, लवकर माजावर येत नाहीत. मोठी झाल्यानंतर कमी उत्पादनक्षम बनतात.

म्हणून वासरांचे कमी खर्चात कमी दूध पाजून चांगल्याप्रकारे संगोपन करण्यासाठी वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसरचा वापर करावा. 

मिल्क रिप्लेसर म्हणजे काय ?

दुधाऐवजी, दूध भुकटी आणि इतर घटक मिळून दुधाच्या दर्जाचे आणि तितकेच पचनीय मिश्रण तयार करून वासरांसाठी वापरता येते,याला मिल्क रिप्लेसर म्हणतात.

मिल्क रिप्लेसर हे प्रामुख्याने स्कीम मिल्क पावडर, व्हे प्रोटीन, वनस्पतिजन्य प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, क्षार खनिजे, ॲन्टिऑक्सिडंट्स यापासून बनवलेले असते.

मिल्क रिप्लेसर पावडरमध्ये सर्वसाधारपणे २० ते २८ टक्के प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे १८ ते २२ टक्के इतके असते. मिल्क रिप्लेसर भुकटीच्या स्वरूपात असते.

ज्यामध्ये पाणी मिसळून दुधाच्या दर्जाचे मिश्रण तयार करता येते. तयार झालेले मिश्रण हे संपूर्ण दुधाऐवजी किंवा काही प्रमाणात दूध कमी करून त्याऐवजी वापरता येते.

विविध सहकारी दूध संघ तसेच स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मिल्क रिप्लेसर बाजारात उपलब्ध आहे.

गाई, म्हशींच्या दुधातील घटकांचे प्रमाण हे दूध देणाच्या काळानुसार बदलत असते. परंतु मिल्क रिप्लेसरमधील पोषणतत्त्वाचे प्रमाण हे एकसारखे असते. त्यामुळे उत्तमवाढीसाठी मिल्क रिप्लेसर पोषक ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT