Pune News : अखेर निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे..राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांची आज (ता. ४ ) निवडणूकीबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत निवडणूक आयुक्तांनी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पार पाडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगितले. .Local Body Elections: बारा नोव्हेंबरला मतदार यादी होणार जाहीर.नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर १७ नोव्हेंबर ही उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल, तर २५ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. मतदान २ डिसेंबर रोजी घेण्यात येईल आणि निकालाची घोषणा ३ डिसेंबर रोजी केली जाईल असे सांगितले..आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात येत आहे. या निवडणुकांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ईव्हिएम मशीनद्वारे होणार आहे..Local Body Election: नव्यांना संधी; दिग्गजांची निराशा.ते पुढे म्हणाले की, मतदार याद्यांतील त्रुटींमुळे काही पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, आयोगाने स्पष्ट केले की ७ नोव्हेंबरपर्यंतच्या मतदार याद्या वापरूनच मतदान पार पाडले जाईल. नगरपरिषदेसाठी एका मतदाराला २ ते ३ वेळा मतदानाचा अधिकार, तर नगरपंचायतींसाठी २ वेळा मतदानाचा अधिकार मिळणार आहे.  दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे. त्यामुळे दुबार मतदारांना त्यांच्या मतदार संघात मतदान करता येणार आहे..दुबार मतदाराच्या नावासमोर दुहेरी स्टार चिन्ह दिसल्यास आणि त्याने प्रतिसाद दिला नाही, तर त्या मतदाराकडून कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नाही, असे लेखी निवेदन घेतले जाणार आहे. तसेच, त्या निवेदनात या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही, असेही त्याच्याकडून लिहून घेतले जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली..दरम्यान, या निवडणुकीत एकूण २८८ नगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे. तर, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, तसेच अर्ज सादर करताना जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रांच्या इमारतींमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी असेल. मात्र थेट मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असेल. त्यामुळे कोणत्या केंद्रात मोबाईल नेता येईल, हे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांवर अवलंबून असणार आहे अशीही माहिती त्यांनी पत्रकारपरिषदेत दिली..राज्यातील एकूण ५३ लाख पुरुष आणि ५३ लाख महिला, अशा १ कोटी ७ लाख मतदारांचे मतदान अपेक्षित आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी २८८ निवडणूक अधिकारी काम पाहणार आहेत.  तसेच, आचार संहितेची ऑर्डर काढली असून मद्य आणि पैशाबाबत प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांना मार्गदर्शनही केले आहे. बँका आणि पतपेढ्याच्या व्यवहारावर लक्ष  ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहतूकीवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत असेही निवडणूक आयुक्त  दिनेश वाघमारे यांनी सांगितले..काय आहे नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांतील खर्च मर्यादाअ वर्ग नगरपरिषद: अध्यक्ष - १५ लाख, सदस्य - ५ लाखब वर्ग नगरपरिषद: अध्यक्ष - ११ लाख २५ हजार, सदस्य - ३ लाख ५० हजारक वर्ग नगरपरिषद: अध्यक्ष - ७ लाख ५० हजार, सदस्य - २ लाख ५० हजारड वर्ग नगरपंचायत: अध्यक्ष - ६ लाख, सदस्य - २ लाख २५ हजार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.