Animal Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : पावसाळ्यात पशुधनाला रोगाच्या संसर्गाचा इशारा

Animal Care : पावसाळ्याच्या तोंडावर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पशुधनाला विविध संसर्गाचा इशारा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

Team Agrowon

Pune News : पावसाळ्याच्या तोंडावर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पशुधनाला विविध संसर्गाचा इशारा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली असून, विविध जिल्ह्यांना पशुधनांना लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाळ्यात विविध पशुधनांना घटसर्प, शेळ्या मेंढ्यांना देवी, फऱ्या, पीपीआर, लाळ्या खुरकूत आदी विविध रोगांची लागण होण्याचा धोका असतो. गेल्या दोन वर्षांत लम्पी स्कीनसारख्या रोगाने मोठ्या प्रमाणावर पशुधनांचा मृत्यू झाला होता. यंदाही लम्पी स्कीनसारख्या रोगाचा उद्रेक होण्याचा धोका केंद्र सरकारने वर्तविला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विविध रोगांची लागण रोखण्यासाठी विविध लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर लम्पी स्कीनची बाधा रोखण्यासाठी राज्यात या हंगामात ५८ लाख ६३ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. लाळ्या खुरकूत रोखण्यासाठी लसीकरणाच्या चार फेऱ्यांमधून १ कोटी ८२ लाख पशुधनाला म्हणजेच ९३ टक्के पशुधनाला लसीकरण करण्यात आले आहे.

शेळ्या मेंढ्यांसाठी अत्‍यंत जीवघेणा असलेल्या पीपीआर प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढील चार वर्षे सलग लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या फेरीमध्ये ९३ लाख ५७ लाख म्हणजेच ७० टक्के लसीकरण करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

गायी म्हशींमधील सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेल्लोसिस) रोखण्यासाठी ४ ते ८ महिन्यांच्या कालवडी आणि म्हशींच्या पारड्यांना सुरू असलेल्या पहिल्या फेरीमध्ये १९ लाख ६१ हजार म्हणजेच ६८ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. घटसर्फ व फऱ्याची लागण रोखण्यासाठी मॉन्सूनपूर्व लसीकरणामध्ये ३८ लाख म्हणजेच २० टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित लसीकरण सुरू असल्याचे सांगण्यात आले.

‘लम्पी’ रोखण्यासाठी या करा उपाययोजना

- हा रोग बाह्यकीटक (डास, माश्‍या, गोचिड) यांच्यामुळे होत असल्याने त्यांच्यावर नियंत्रणासाठी गोठ्यांची स्वच्छता ठेवावी.

- निरोगी पशुधनाला बाधित पशुधनापासून विलगीकरण करून ठेवावे.

- गायी व म्हशींनी एकत्रित बांधू नये.

- पशुधन आजारी असल्याचे जाणवल्यास तातडीने पशुवैद्यकियांना दाखवून तातडीने उपचार करावेत.

पावसाळ्यात पशुधन आजारी पडू नये यासाठी मॉन्सूनपूर्व लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये विविध लसीकरण झाले असून, उर्वरित लसीकरण सुरू आहे. प्रत्येक पशुपालकाने आपापल्या पशुधनाचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आम्ही केले असून, त्यानुसार सर्व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लसीकरणाची मोहीम सुरू आहे. एकही पशुधन लसीकरणापासून राहणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत.
- कौस्तुभ दिवेगावकर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT