Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy vaccination : चिपळूणमध्ये सहा हजार जनावरांचे लसीकरण

चिपळूण तालुक्यात ३५ हजार जनावरांची नोंद आहे. लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्याला १० हजार लस पाठवण्यात आल्या होत्या.

टीम ॲग्रोवन

चिपळूण, जि. रत्नागिरी ः तालुक्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) झाला नसला तरी तो होऊ नये यासाठी पशुसंवंर्धन विभागाकडून ()Department Of Animal Husbandry) विशेष काळजी घेतली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर येथील शेतकऱ्यांच्या गोधनासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण मोहीम (Lumpy Vaccination Drive) हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार चिपळूण तालुक्यात आतापर्यंत सुमारे ६ हजार जनावरांचे लसीकरण (Animal Vaccination) करण्यात आले आहे.

चिपळूण तालुक्यात ३५ हजार जनावरांची नोंद आहे. लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्याला १० हजार लस पाठवण्यात आल्या होत्या.

यामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या रामपूर, सावर्डे, कापरे, कळकवणे, कुंभार्ली, वहाळ, तुरंबव, नांदगाव या आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ४ हजार ६०० लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी ३ हजार ५१२ जनावरांना लस देण्यात आली.

त्यातील ११२ लस वाया गेल्या असून, सध्या ९७६ लस शिल्लक आहेत. राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ५ हजार ४०० लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी २ हजार ४१५ जनावरांना लस देण्यात आली, तर ७९ लस वाया गेल्याने सध्या २ हजार ९०६ लस शिल्लक आहेत, असेचिपळूण पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी व्ही. एस. बारापात्रे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT