Cattle Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccination : बाधित पशू आढळताच लसीकरण

रायगडच्या चौलमध्ये ५०० लसी; पशुसंवर्धनची मोहीम तीव्र

टीम ॲग्रोवन

अलिबाग : लम्पी स्कीन आजाराला रोखण्यासाठी तालुका पशुसंवर्धन (Animal Husbandry) विभागाकडून पावले उचलण्यात येत असून गावोगावी गुरांच्या लसीकरणाची (Lumpy Vaccination) मोहीम वेगाने सुरू आहे. चौलसह मल्याण, आंदोशी, बेलोशी अशा अनेक गावांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. पशुपालकांचा गुरांच्या लसीकरणाला प्रतिसाद मिळत असून स्वतःहून पुढाकार घेत लसीकरणावर भर दिला जात आहे.

अलिबाग तालुक्यात चौल परिसरात लम्पी स्कीन बाधित पशुधन आढळले आहे. प्रादुर्भाव वाढू नये यासाठी चौल परिसरात ५०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. बेलोशी ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा भोपी यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.

शनिवारी डॉ. सुहास जोशी, भगवान नाईक, बेलोशी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काटले, भास्कर भोपी आदींसह असंख्य पशुपालक उपस्थित होते. मल्याण, आंदोशी, वावे, चौल अशा अनेक गावांमध्ये गुरांचे लसीकरण सुरू आहे. लम्पीचा परिणाम पशुधनावर होऊ नये, यासाठी पशुपालक उपाययोजना करीत आहेत.

पशुसंवर्धन विभागासह ग्रामपंचायतीकडूनही लम्‍पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी भित्तीपत्रके लावण्यात येत असून पशुअधिकाऱ्यांकडून तपासणीही सुरू आहे. लम्पी स्कीन आजाराबद्दल अनेकांना भीती वाटते. हा आजार इतर प्राण्यांमध्येही पसरण्याची शक्यता वाटते. यासंदर्भात जनजागृती होत आहे. मात्र खबरदारी म्हणून चिकन-मटण खाणे तात्पुरते बंद केले.

- बल्लेश सावंत, तरुण, पाली

लम्पी स्कीन हा फक्त आणि फक्त गाई, वासरे व बैल यांना होणारा आजार आहे. हा कोंबड्यांना किंवा माणसांना होणारा आजार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास न ठेवता चिकन, मटण खावे,

दूधही बिनधास्त प्यावे आणि तंदुरुस्त राहावे. लम्‍पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्‍मक लसीकरण सुरू आहे.

- डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी, सुधागड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT